मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल (9 डिसेंबर) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. (cm devendra fadnavis doesnt want these 7 leaders they will not get ministerial posts)
ADVERTISEMENT
16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे यंदा नसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 जणांच्या नावावर फुली मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हे ही वाचा>> Ram Satpute : "2029 ला गुलाल लागला नाही, तर मी..." राम सातपुते इरेला पेटले, पडळकर सदाभाऊंसमोर काय म्हणाले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच स्थान दिले जाणार आहे. माजी वादग्रस्त मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये यावर एनडीएचे केंद्रीय नेतृत्व ठाम आहे.
'या' नेत्यांना मंत्रिमंडळात नो एंट्री?
शिवसेना (शिंदे गट)
- संजय राठोड - अन्न आणि औषध प्रशासन, जलसंधारण विभाग
- अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक व पणन विभाग
- तानाजी सावंत - आरोग्य विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- दिलीप वळसे पाटील - सहकार विभाग
- हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण विभाग
भाजप
- सुरेश खाडे - कामगार विभाग
- विजयकुमार गावित - आदिवासी कल्याण विभाग
महायुतीतील या 7 नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
हे ही वाचा>> Durgadi Fort वर मशीद नाही मंदिरच, 48 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल.. वक्फची मागणीही फेटाळली!
महायुतीतील संभाव्य मंत्र्यांची यादी
शिवसेना (शिंदे गट)
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- प्रताप सरनाईक
- आशिष जैस्वाल
- राजेश क्षीरसागर
- अर्जुन खोतकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- छगन भुजबळ
- धनंजय मुंडे
- धर्मरावबाबा आत्राम
- आदिती तटकरे
- संजय बनसोड
- नरहरी झिरवाळ
- दत्ता भरणे
- अनिल भाईदास पाटील
- मकरंद आबा पाटील
भाजप
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- सुधीर मुनगंटीवार
- चंद्रशेखर बावनकुळे
- रवींद्र चव्हाण
- मंगल प्रभात लोढा
- राधाकृष्ण विखे पाटील
- शिवेंद्रराजे भोसले
- अतुल सावे
- पंकजा मुंडे
- माधुरी मिसाळ
- देवयानी फरांदे
- संजय कुटे
- आशिष शेलार
- गणेश नाईक
ADVERTISEMENT