Exclusive: ‘उद्धव ठाकरे संत माणूस, पण शकुनी मामाच्या..’, कोश्यारींचा पवारांवर वार?

मुंबई तक

20 Feb 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:34 PM)

पाहा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पवारांवर काय टीका केली आहे. प्रश्न: विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर तुम्ही शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. भगतसिंह कोश्यारी: MVA ने पत्रात राज्यापालांना धमकी दिलेली. तसं पत्र पाठवलं नसतं तर मी पुढच्याच दिवशी सही करणार होतो. प्रश्न – तुमचे संबंध […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

पाहा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पवारांवर काय टीका केली आहे.

प्रश्न: विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर तुम्ही शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही.

भगतसिंह कोश्यारी: MVA ने पत्रात राज्यापालांना धमकी दिलेली. तसं पत्र पाठवलं नसतं तर मी पुढच्याच दिवशी सही करणार होतो.

प्रश्न – तुमचे संबंध चांगले असते, तर अशा प्रकारचं पत्र पाठवलं गेलं नसतं.

भगतसिंह कोश्यारी – माझे संबंध खूप चांगले होते, पण उद्धव ठाकरे शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले. माहिती नाही, त्यांचा शकुनी मामा कोण होता.

प्रश्न – एकनाथ शिंदेंच्या बाजूचे आमदार तुमच्याकडे येऊन सांगत होते की, उद्धव ठाकरे चुकीचं करत आहेत?

भगतसिंह कोश्यारी: उद्धव ठाकरे तर संत माणूस आहेत. ते राजकारणात अडकले गेले. तुम्हाला माहितीये उद्धव ठाकरे का आणि कसे फसले.

प्रश्न – शरद पवारांनी पंतप्रधानांकडे तक्रार केलेली की, राज्यपाल म्हणून तुमची वागणूक चांगली नाही.

भगतसिंह कोश्यारी: शरद पवार विरोधात आहेत, ते माहिती काय तक्रार करतील. त्यांनी हायकोर्टाचं जे जजमेंट आहे लवासाबद्दल, ते बघावं.

अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp