Rajya sabha election 2024: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Former Congress president Sonia Gandhi) यांनी त्यांची खासदारकी रायबरेलीमधून (Raebareli) लढवली होती. मात्र आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार नसून त्यांनी राज्यसभेसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याानंतर त्यांनी रायबरेलीविषयी भावूक होत रायबरेलीलाच पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपला राजकीय प्रवास सांगत गांधी घराण्याला (Gandhi Family) रायबरेकरांनी भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे आता राज्यसभेवर आपण जात असले तरी माझं मन आणि आत्मा हा रायबरेलीतील माणसांसोबतच राहिल असं भावूक पत्रच त्यांनी लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीत माझं कुटुंब अपूर्ण
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र माझं मन सगळं रायबरेलीत असल्याचेच त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, 'दिल्लीत माझं कुटुंब अपूर्ण आहे, मात्र ते रायबरेलीला आलं की, तुम्हाला भेटून पूर्ण होतं.'
तुम्ही आपलेपण जपलं
सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्या गांधी घराण्याविषयी म्हटले आहे की, 'स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत माझे सासरे फिरोज गांधी यांना तुम्ही निवडून देऊन दिल्लीत पाठवलं, त्यानंतर माझ्या सासू इंदिरा गांधींनाही पाठवून तुम्ही आपलेपण जपलं.'
रायबरेलीकरांनी चालायला शिकवलं
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून आपला उमेदवार अर्ज दाखल केला असला तरी त्या मनानं रायबरेलीमध्येच असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 'आयुष्यातील सगळे चढ उतार हे सगळं चालू असलं तरी रायबरेलीकरांनी मला या राजकीय वाटेवर चालायला शिकवलं' असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
मला पदरात घेतलं
सोनिया गांधी यांनी आपल्या सासू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जाण्यानंतरही रायबरेलीमधून त्यांना मदत मिळाली. रायबरेकरांनी मला पदरात घेतल्याचं सांगितलं आहे.
लोकसभा लढविणार नाही
सोनिया गांधी यांनी आपल्या प्रकृती नसल्याचे सांगत आता मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही असंही त्यांनी पत्रातून स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हे ही सांगितलं आहे की, थेट निवडणूक लढविणार नसल्याने रायबरेलीकरांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही पण माझं मन आणि आत्मा मात्र रायबरेलीमध्ये कायम असेल असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT