पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषीराज सावंत याचे पुणे विमानतळावरून अपहरण करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती असून पोलीस याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास सुरू केला आहे. सावंत यांना गिरीराज व ऋषीराज अशी 2 मुले आहेत. गेल्या काही महिन्यापासुन सावंत कुटुंब हे टार्गेटवर असल्याचे काही घटनावरून समोर आले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय यांच्या घरासमोर गोळीबार त्यानंतर धमकी व आता अपहरण अशी घटना घडली आहे.
हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis राज ठाकरे यांच्या भेटीला, राऊत म्हणाले शिवाजी पार्कवर कॅफे उघडलाय...
पुणे पोलिसांनी काय दिली माहिती?
'पोलीस कंट्रोल रुमला एक माहिती मिळाली की, तानाजी सावंत साहेबांचा मुलगा यांचं कोणी तरी घेऊन गेलेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.'
'तो पुण्यावरून फ्लाइटने गेला आहे. फ्लाइट कोणत्या दिशेने चालली आहे याची माहिती घेणं सुरू आहे. त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबद्दल पोलिसात अपहरणाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने क्राइम ब्रांचकडे हा तपास देण्यात आला आहे. प्राथमिक माहिती हीच आहे.' अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा>> Eknath Shinde : स्वत:ला संपवलेल्या शिरीष महाराजांच्या कुटुंबासाठी धावले एकनाथ शिंदे, अख्खं कर्ज फेडलं
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?
'आम्हाला ड्रायव्हरच्या माध्यमातून माझा मुलगा आणि त्याचे मित्र विमानातून कुठेतरी गेले असल्याची माहिती मिळाली. ड्रायव्हरने त्यांना विमानतळाच्या इथे सोडले. माझा मुलगा आणि त्याचे दोन मित्र सोबत आहेत. आमचे रोज व्यवस्थित कम्युनिकेशन होत असते. मात्र आज बोलणे न झाल्याने थोडा चिंतित होतो.'
'तो कुठेही जाताना इन्फॉर्म करून जातो मात्र आज तसे घडले नाही. तो सध्या कुठे आहे याबाबत काहीही माहिती नाही. पोलीस तपास करत आहेत.' असं तानाजी सावंत यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
