Gulabrao Patil challege to sanjay raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे गटाचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabroa Patil) यांच्यावर 400 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता गुलाबराव पाटील म्हणालेत, तीन महिन्यात चौकशी करा, दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही, नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असे आव्हानंच राऊतांना दिले आहे. (gulabroa patil challege to sanjay raut investigate in three months)
ADVERTISEMENT
जळगाव जिल्ह्यात 190 कोटी खर्च करावे असे शासनाचे आदेश होते. त्यापैकी आम्ही 121 कोटीला मान्यता केली आणि 90 कोटी वितरित केले होते. आणि 3 वर्षात फक्त 81 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती गुलाबराव पाटील (Gulabroa Patil) यांनी दिली होती. आणि ज्या ठिकाणी तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च होत आहेत, त्या ठिकाणी 400 कोटीचा घोटाळा कसा होईल? असा सवाल त्यांनी संजय राऊतांना केला.संजय राऊत यांना माझा चॅलेंज आहे, त्यांनी तीन महिन्यात चौकशी करावी. मी बॉन्ड लिहून देतो, जर चौकशीत दोषी आढळलो तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही, नाहीतर त्यांनी खासदारकीचे राजीनामा द्यावा, असं खुलं चॅलेजचं गुलाबराव पाटील (Gulabroa Patil) यांनी राऊत यांना दिले आहे.
हे ही वाचा : ‘उद्धवजी तुमची गत….’, पंतप्रधान मोदींच्या एकेरी उल्लेखानंतर बावनकुळे संतापले
उलटा चोर कोतवाल को दाटे ही म्हण देखील त्यांनी राऊतांना उद्देशून म्हटली. तसेच तुम्ही पुण्यात आणि ठाण्याचे व्यवहार कसे केले आहेत हे आम्हाला माहिती आहे.तुमचा व्याही कलेक्टर असतातना तिकडे काय काय झाले? हे ही आम्हाला माहितीय, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
संजय राऊतांचे आरोप काय?
जळगावमध्ये एक गुलाबो गॅंग आहे. ज्यांनी 50 कोटी घेऊन शिवसेना सोडली. ही लोक शिवसेनेच्या मेहरबानीवर निवडून आले आणि नंतर विकले गेल्याचे संजय राऊत म्हणाले होते. माझ्याकडे गुलाबराव पाटलांच्या (Gulabroa Patil) भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोरोनाच्या काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होते. दोन लाखांचं व्हेंटीलेटर 15 लाखांना खरेदी केले होते. हा घोटाळा साधारण 400 कोटी रूपयांचा आहे. हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
ADVERTISEMENT