Harshvardhan Patil : ''महायुतीत मला टार्गेट केलं जातंय'', हर्षवर्धन पाटलांचा नेमका रोख कुणावर?

मुंबई तक

03 Aug 2024 (अपडेटेड: 03 Aug 2024, 08:38 PM)

Harshvardhan Patil News : महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणूक आली की हर्षवर्धन पाटलाला टार्गेट करायचं हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे'', असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधलाय.

harshvardhan patil big statement web are being targeted by mahayuti ajit pawar maharashtra politics

महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय

follow google news

बातम्या हायलाइट

point

यंत्रणा जाणीवपूर्वक मला टार्गेट करतायत

point

मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो.

point

महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय

Harshvardhan Patil News : वसंत मोरे, बारामती : ''कोणत्याही निवडणुका आल्या की बरेच लोक आणि यंत्रणा जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. महाविकास आघाडीत असतानाही बरीच लोक मला टार्गेट करायचे, आता महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी खदखद भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी बोलून दाखवली.  (harshvardhan patil big statement web are being targeted by mahayuti ajit pawar maharashtra politics) 

हे वाचलं का?

''आम्ही दादागिरी, अपशब्द वापरत नाही. कधी कुणाला त्रास दिला नाही. पण कोणत्याही निवडणुका आल्या की बरेच लोक आणि यंत्रणा जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. मागील वीस वर्षे आपण महाविकास आघाडीत होतो. त्यावेळेस देखील बरीच लोक मला टार्गेट करायचे, आता महायुतीत आहे तरी देखील मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो.
 निवडणूक आली की हर्षवर्धन पाटलाला टार्गेट करायचं हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे'', असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : Mumbai Weather : मुंबईकरांना पाऊस धरणार वेठीस! IMD कडून तुफान पावसाचा इशारा

''मागील वेळी आपण महाविकास आघाडीत होतो. त्यावेळी देखील आपण लोकसभेला प्रामाणिकपणे काम केले. कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला ही आमचा त्यांचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. असं असताना सुद्धा आता हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडायचं त्याच्या कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं अशा पद्धतीने बरीच लोक आमच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत. असं सामान्य माणसं बोलत आहेत आणि मला ते अनुभवायला मिळतंय'' असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

''मध्यंतरी मला गावागावात फिरू देणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य ही झाली होती. तशा पद्धतीची यंत्रणा वेगवेगळ्या मार्गातून आमच्या बाबतीत पुन्हा घडतेय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. मी तर त्याच वेळेस एक पत्र ही दिलं होतं ट्वीटही केलं होतं पण तशा पद्धतीच्या घटना आता मला टार्गेट केलं जात असल्यामुळे पुन्हा घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : Paris Olympic 2024 : 46 सेकंदात प्रतिस्पर्ध्यांला गारं केलं, नंतर महिला बॉक्सरवर पुरूष असल्याचा आरोप; नेमका वाद काय?

दरम्यान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. उद्याच्या होणाऱ्या इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर उफाळून येतंय की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.

    follow whatsapp