Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 06 Oct 2024, 12:26 PM)

Haryana Exit Poll Result 2024 : हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता 8 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात मोठा उलटफेर होणार आहे. हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार आहे.

haryana exit poll result 2024 congress bjp jjp fight assembly election exit poll result

हरियाणाची सत्ता कुणाच्या हाती येणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

हरियाणात भाजपची हँट्ट्रीक चुकणार?

point

काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेवर येणार?

point

हरियाणाचे एक्झिट पोलचे आकडे काय?

Haryana Exit Poll Result 2024 : हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता  8 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे.तत्पुर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात मोठा उलटफेर होणार आहे. हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार आहे, तर काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेत परतणार आहे. सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार हरियाणात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. (haryana exit poll result 2024 congress bjp jjp fight assembly election exit poll result) 

हे वाचलं का?

हरियाणात एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 ते 28 तर काँग्रेसला 50 ते 58 जागा मिळतील असा अंदाज आहे. जेजेपीला 0-2 जागा मिळत आहेत आणि इतरांना 10 ते 14 जागा मिळत आहेत.

हे ही वाचा : Narendra Modi: "मी आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलोय...",ठाण्यात PM नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

हरियाणा एक्झिट पोलचा निकाल 

भाजप : 20 ते 28 जागा 
काँग्रेस : 50 ते 58 जागा 
जेजेपील : 0 ते 2 जागा
अपक्ष : 10 ते 14 जागा

हरियाणात गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत होती. यंदाच्या वर्षी भाजपचा हॅट्ट्रीक मारून सत्तेवर येण्याची संधी होती. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानूसार भाजपला अवघ्या 20 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एक्झिट पोलनूसार भाजपची सत्तेतून एक्झिट होताना दिसते आहे. तर काँग्रेसला 50 ते 58 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचा आकडा काढला दिसतेय. त्यामुळे पोलनुसार काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेत येणार आहे. 

हे ही वाचा : Exit Poll Result : जम्मू काश्मीरात भाजपला बसणार झटका? 'हा' पक्ष पोहोचला बहुमतानजीक

एक्झिट पोलनुसार जेजेपीला अवघ्या 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अपक्षांना 10 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 10 वर्षांनी सत्तेत वापसी करताना दिसते आहे.  

    follow whatsapp