'मंत्री पदासाठी शिंदे मातोश्रीवर येऊन रडले' आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई तक

18 Feb 2024 (अपडेटेड: 18 Feb 2024, 08:42 PM)

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांंच्यावर टीका करत, तुम्ही फक्त राजीनामा द्या मी तुमच्या विरोधात लढायला तयार असल्याचं थेट आव्हान त्यांनी शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यातून दिलं आहे.

Aditya Thackeray

Aditya Thackeray

follow google news

बातम्या हायलाइट

point

'खोटं बोला पण रडून बोला'

point

'मंत्री पदासाठी शिंदे मातोश्रीवर येऊन रडले'

point

अवकाळी सरकार डोक्यावर बसवलं

Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत त्यांना, 'तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे' असं थेट आव्हान दिलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले आणि मंत्री पदासाठी रडले असल्याचे सांगत यावेळी त्यांनी त्यांची नक्कलही केली. 

हे वाचलं का?

अवकाळी सरकार डोक्यावर बसवलं

आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील आनंदनगरमध्ये सभा घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विश्वासघात करून ज्या लोकांनी सरकार पाडले. त्याच लोकांमुळे नंतर हे अवकाळी सरकार डोक्यावर बसवलं असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला. 

हे ही वाचा >> 'नातं तोडण्याची भूमिका राजकारणात नको' जयंत पाटील नात्यावर बोलले

शिंदे मातोश्रीवर येऊन रडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी मातोश्रीवर येत अनेकदा त्यांनी अश्रू ढाळले आहेत. त्यांच्या मंत्री पदासाठीही ते मातोश्रीवर येऊन रडले असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली. यावेळी त्यांनी रडण्याची नक्कल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा कसा विश्वासघात केला हे ही त्यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास खात्यासाठी शिंदे रडले

राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नगरविकास खातं अनेकदा मुख्यमंत्र्यांकडेच राहिले आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी हे खातं आपल्याकडे न ठेवता त्यांनी एकनाथ शिंदेंना दिले. त्या खात्यासाठी ते अनेकदा येऊन मातोश्रीवर येऊन रडले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी राजीनामा देतो असंही त्यांनी येऊन आम्हाला सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली.

ठरवून विश्वासघात केला

ज्या लोकांना उद्धव ठाकरे यांनी आमदार, मंत्री केले. त्यातीलच काही लोकांनी ठरवून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला आहे. त्यांनी शिवसेना हा पक्ष पळवला आहे आणि त्यांनीच शिवसेनेचे चिन्हंही पळवल्याचे सांगितले, आणि त्याच लोकांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

    follow whatsapp