IAS Pooja Khedkar WhatsApp Chat पुणे: महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहे. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व आणि नॉन क्रिमिलियरचे बनावट प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप आहे. पूजा यांनी 2021 मध्ये परीक्षा दिली होती आणि त्यांचा अखिल भारतीय रँक 821 होता. पण आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, त्यामुळे आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. याचवेळी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यानी पूजा खेडकरांबाबत जो अहवाल शासनाला दिला होता त्यात पूजा खेडकरांचे WhatsApp चॅट देखील जोडण्यात आले आहेत. हेच चॅट आता समोर आले आहे. (ias pooja khedkar whatsapp chat surfaced what exactly is in it pune collector report)
ADVERTISEMENT
पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पूजा यांनी स्वत:साठी स्वतंत्र कार्यालय, एक कार आणि घराची मागणी केली होती, असे तिच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅटमधून समोर आले आहे. चॅटमध्ये, 3 जूनला रुजू होण्याआधी त्यांनी वरील गोष्टींची मागणी केली होती, तशा स्वरूपाच्या सूचना त्यांना अधिकाऱ्याना करताना दिसत आहे.
हे ही वाचा>> Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral
चॅटमधून या गोष्टी झाल्या उघड
चॅटमधून असं समोर आलं की, त्या अधिकाऱ्याला म्हणाल्या की, 'मी 3 जूनला रुजू होण्यापूर्वी केबिन किंवा वाहनाचे काम पूर्ण करा, नंतर वेळ मिळणार नाही. हे शक्य नसेल तर मला कळवा, मी याबाबत जिल्हाधिकारी सरांशी बोलेन.' जिल्हाधिकाऱ्यांनी या असामान्य मागण्या मुख्य सचिवांकडे मांडल्या होत्या, त्यांनी त्यांच्या अहवालात पूजा खेडकरांचे प्रशिक्षण पुण्यात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे सुचविले होते आणि त्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
प्रोबेशनवर असणाऱ्या IAS ला या सुविध नाहीत!
परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांना परिविक्षाधीन असताना या सुविधांचा अधिकार नसून त्यांना निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. वाशिममध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आले आणि त्या 30 जुलै 2025 पर्यंत 'सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर' म्हणून काम करतील.
हे ही वाचा>> IAS Pooja Khedkar Father: वादग्रस्त कारकीर्द, 40 कोटींची संपत्ती... IAS पूजा खेडकरांचे वडील आहेत तरी कोण?
बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप
दरम्यान, या सगळ्या वादानंतर त्यांच्या नियुक्तीच्या कागदपत्रांच्या छाननीत त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. तसेच असाही आरोप आहे की, इतर मागासवर्गीय (OBC) च्या क्रिमी लेयरमध्ये त्या येतात. पण तरीही त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला. इतकंच नाही तर पूजा खेडकर यांनी लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली त्यांची वैयक्तिक ऑडी कार वापरली होती आणि खासगी कारवर 'महाराष्ट्र सरकार' असा बोर्डही लावला होता.
पूजा यांनी 6 वेळा दिला वैद्यकीय तपासणीला नकार
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूजा खेडकर हिने ओबीसी आणि दृष्टिहीन श्रेणी अंतर्गत नागरी सेवा परीक्षा दिली होती, तिने मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केले होते. एप्रिल 2022 मध्ये, तिला तिच्या अपंगत्वाची पुष्टी करण्यासाठी दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलाविण्यात आलं होतं, तथापि, पूजा खेडकरने 6 वेगवेगळ्या प्रसंगी या परीक्षांना उपस्थित राहण्यास नकार दिला होता. नंतर तिने एका खाजगी केंद्रातून एमआरआय स्कॅनिंग प्रमाणपत्र सादर केलं होतं.
एवढेच नाही तर पूजा खेडकर यांच्या ओबीसी नॉन क्रिमी लेयर उमेदवाराच्या दाव्यातही तफावत आढळून आली. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांची संपत्ती ४० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे त्यांच्या ओबीसी पात्रतेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
ADVERTISEMENT