Uddhav Thackeray : मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे कडाडले! ''बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख...''

मुंबई तक

• 06:45 PM • 15 Sep 2024

Uddhav Thackeray News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ( Dy chandrachud) यांच्या निवासस्थानी जाऊन गपणतीचे दर्शन आणि आरती केली होती. मोदींच्या या कृतीनंतर सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांवर विरोधकांनी टीका केली होती. या भेटीवर आता ठाकरेंनी भाष्य केले आहे.

मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे कडाडले!

uddhav thackeray on pm modi and cji dy chandrachud meet resident ganapati festival maharashtra politics chhatrapati sambhajinagar vaijapur

follow google news

बातम्या हायलाइट

point

धनुष्यबाणाचा निकाल लागेल की नाही हे माहित नाही

point

दोन वर्षांपासून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत आहोत

point

या लोकांनी नुसती थट्टा चालवली आहे

Uddhav Thackeray News : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ( Dy chandrachud) यांच्या निवासस्थानी जाऊन गपणतीचे दर्शन आणि आरती केली होती. मोदींच्या या कृतीनंतर सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांवर विरोधकांनी टीका केली होती. या भेटीवर आता ठाकरेंनी भाष्य केले आहे. ''आपल्या धनुष्यबाणाचा निकाल लागेल की नाही हे माहित नाही. काल परवा पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांचा घरी भेट दिली होती आणि सर्वांनी त्याचा निषेध केला होता. पण मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण नशीब मोदी घरी येणार म्हणत त्यांनी गणपतीला पुढची तारिख नाही दिली'', असा जोरदार टोला ठाकरेंनी सरन्यायाधीशांना लगावला आहे.  (uddhav thackeray on pm modi and cji dy chandrachud meet resident ganapati festival maharashtra politics chhatrapati sambhajinagar  vaijapur) 

हे वाचलं का?

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये ठाकरे बोलत होते. ''वैजापूरमधील प्रत्येक घरात शिवसेनेची मशाल पोहोचली पाहिजे, असं वचन मला तुमच्याकडून हवं आहे. येत्या काळात तुमच्यासमोर धनुष्यबाण व मशाल असे दोन पर्याय असतील. गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील, तर आपल्याकडे मशाल आहे'', असे ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे. 

हे ही वाचा : पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर! बाळाला पाजलं अंगावरचं दूध, पण तपासातून समोर आली भयंकर माहिती

तसेच ''या निवडणुकीच्या आधी आमदार अपात्रतेसंदर्भात पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून आपण किती अपेक्षा करायची, मुळात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायची की नाही करायची याची मला कल्पना नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा आपल्या सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले. त्या घटनेची संपूर्ण देशभर निंदा झाली. पण मी त्यांची निंदा करण्याऐवजी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घरी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही हे नशीब. याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत. कदाचित ते गणपती बाप्पाला म्हणाले असते, आमच्याकडे नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे बाप्पा तू जरा नंतर ये. हा सगळा प्रकार पाहून असं वाटतं की या लोकांनी नुसती थट्टा चालवली आहे,अशी जोरदार टीका ठाकरेंनी मोदी आणि चंद्रचुड यांच्यावर केली. 

''दोन वर्षांपासून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत आहोत. मुळात हा खटला केवळ शिवसेनेचा नाही, तर त्या माध्यमातून देशातील लोकशाही जीवंत राहणार की नाही हे त्यांनी देशाला सांगायला हवं होतं. आमचा न्यायदेवतेवर जरूर विश्वास आहे, परंतु न्याय वेळेत मिळाला नाही तर त्या न्यायालयापेक्षा मोठं न्यायालय माझ्यासमोर बसलं आहे. या न्यायालयाचं नाव आहे जनतेचे न्यायालय आणि हेच देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे, असं मी मानतो. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात आलो आहे. आजपासून मी सातत्याने जनतेच्या दरबारात जाईन. त्यामुळे मला आता तुमच्याकडून न्याय हवा आहे. निवडणुकीच्या वेळी मी परत येईन'', असे आवाहन ठाकरेंनी जनतेला केले आहे.

    follow whatsapp