Nitin Gadkari on PM Post : देशात पंतप्रधान पदावरून नितीन गडकरींच्या नावाची नेहमीच चर्चा होते. या दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केले आहे. 'लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला आहे. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली असल्याचे ते म्हणाले आहेत. (nitin gadkari big statement on nagpur prime minister post maharashtra politics nagpur story)
ADVERTISEMENT
नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही." असं असलं तरी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव उघड केले नाही किंवा घटनेची माहितीही दिली नाही. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता.''
हे ही वाचा : Mukhyamantri Yojanadoot: 'लाडकी बहीण'नंतर 'यांना' मिळणार महिन्याला 10 हजार, नेमकी योजना काय?
गडकरी नेमकं काय म्हणाले?
नितीन गडकरी म्हणाले, ''मी नाव सांगणार नाही पण मला कोणीतरी सांगितले की तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, मी म्हणालो तुम्ही मला पाठिंबा का द्यावा आणि मी तुमचा पाठिंबा का घ्यावा ? पंतप्रधान हे माझ्या आयुष्यातील लक्ष नाही.. मी माझ्या विश्वासाशी आणि माझ्या संस्थेशी एकनिष्ठ आहे.. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करत नाही, असे गडकरींनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. तर डीटीपी आणि जेडीयू सारख्या पक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करावे लागले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले होते.त्यावेळी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यांनी एकत्रितपणे देशभरात निवडणुका लढवल्या. याचा परिणाम असा झाला की, एनडीएसाठी 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणारा भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले आहेत.
ADVERTISEMENT