Sanjay Raut On Anand Ashram Viral Video: ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे आश्रमात (आनंद आश्रम) सात दिवसांच्या गणपीत विसर्जनाचा सोहळा पार पडला. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता. परंतु, विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्यावर पैसे उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या घटनेचा तीव्र विरोध केला. आनंदआश्रम हे पवित्र स्थळ असून ते खराब करण्याचा काम शिंदे गटाकडून सुरु आहे, असं म्हणत केदार दिघे यांनी विरोधकांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT
संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
"संजय राऊत यांनी आनंद आश्रमात पैसे उधळण्याच्या घटनेवर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, याबाबत कारवाई करणे, पदावरून काढणं, खुलासे आणि माफ्या ही सर्व नौटंकी असते. मुळात राज्यासाठी तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे, हे पाहा. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये अनेक साहित्यिक, कवी, लेखक इथे निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले. या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळून दिली. असे सुसंस्कृत शहर ठाणे आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींचं भाग्य उजळणार! पण काही लोकांच्या अडचणी वाढणार
या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले. सतीश प्रधान, मो.दा जोशी, धर्मवीर आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती त्या वास्तूमधून ते न्याय द्यायचे. दरबार घडवायचे लोकांना भेटायचे. तिथे त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेचे लोक, गुंड लेडीज बार मध्ये नाचतात आणि पैसे उधळतात. लेडीज बार मध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला, आपण पहा हे चित्र अत्यंत विचलित करणारा चित्र आहे.
मी कालही म्हणालो, आनंद दिघे जिथे बसत होते. त्या खुर्चीवर एक हंटर लावलेला असायचा त्या हंटरचा अर्थ असा होता, चुकाल तर पाठीवर हंटर पडेल, असं आम्ही म्हणायचो आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे. आनंद दिघे साहेब असते, तर हे जे लेडीज बारवाले होते मिंधे सेनेची लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला टेंभी नाक्यावर चाबकाने फोडून काढलं असतं. कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली. एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक, दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा घेतला.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : "अमेरिकेत जाऊन घटनेचा...", नारायण राणेंचा राहुल गांधींवर निशाणा
मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे म्हणजे तुमचे कोणी खाजगी नाही. अशा पद्धतीने ठाण्यातील लोकांची मान खाली जाईल. अशा प्रकारचे कृत्य तुम्ही केलं आहे. तुमच्या लोकांनी केलंय. तुमची संस्कृती आहे, ती खाली आली आहे. मिंधे सेनेचे जे वरचे सरदार आहेत. ही त्यांची संस्कृती आहे. ती खाली आली आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल, पदावरून काढलं असेल तर ती पूर्णपणे नौटंकी आहे.
ADVERTISEMENT