India Rename as Bharat news Marathi : G20 परिषदेनंतर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या एका निर्णयाने गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार, याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, मंगळवारी (5 सप्टेंबर) आणखी एक नवीन बाब समोर आली. ज्यातून मोदी सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे बोलले जात आहे की, संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार देशाचे नाव बदलून (इंडिया नाव बदलून भारत) करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते. (Is Modi government going to end the English name of the country)
ADVERTISEMENT
नाव बदलले जाणार याचा अर्थ आता देशाचे नाव भारत गणराज्य असे असेल. लवकरच देशाला इंडिया म्हणणे ही भूतकाळातील गोष्ट ठरू शकते. असे झाल्यास नव्याने स्थापन झालेल्या INDIA आघाडीसाठी हा मोठा धक्का ठरेल. कारण या आघाडीने स्वतःला राष्ट्र हिताला प्राधान्य देत आधाडीला इंग्रजी इंडिया असे नाव दिले.
देशाचे नाव बदलणार, कसे आले समोर?
केंद्र सरकारच्या मनात नेमकं काय आहे, हे लवकरच कळेल. पण, देशाचे इंडिया नाव कायम स्वरुपी संपवण्याचा केंद्राचा विचार असल्याच्या चर्चेला बळ कसे मिळाले, ते पाहुयात. गेल्या दोन दिवसांपासून या चर्चेला खतपाणी देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी हे उघड झाले की, भारताच्या प्रेसीडेंसी G20 ने G-20 भारत हे नवीन हँडल लॉन्च केले आहे. हे G20 चे अतिरिक्त X खाते (ट्विटर) असेल. या अंतर्गत, G20 शी संबंधित टिप्पण्या आणि माहिती भारत नावाने अधिकृत पणे प्रसिद्ध केल्या जातील.
हेही वाचा >> ‘अजित पवारांना राष्ट्रवादीत आणण्याचा घाट’, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
G20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवरही ‘भारत’
त्याचप्रमाणे दुसरी बातमी अशी आहे की राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी जी-20 डिनरसाठी पाठवलेले निमंत्रण पत्रही ‘भारताचे राष्ट्रपती’च्या (President of Bharat) नावाने पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सामान्य व्यवहारात यासाठी फक्त president of India असे वापरले गेले आहे.
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट (ट्विट) करून याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस खासदाराने म्हटले आहे की, ‘तर ही बातमी खरी आहे… राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजीच्या G20 डिनरसाठी नेहमीच्या ‘भारताच्या राष्ट्रपती’ (President of India) ऐवजी ‘राष्ट्रपती’च्या (President of Bharat) नावाने आमंत्रणे पाठवली आहेत.’ याला दुजोरा देणारी निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. हे आमंत्रण एका मंत्र्याच्या नावाने आले आहे, ज्यावर ‘भारताचे राष्ट्रपती’ (President of Bharat) असे लिहिले आहे.
अनेक खासदारांनी नाव बदलण्याची केली आहे मागणी
त्याचप्रमाणे सोमवारी भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भारतीय राज्यघटनेतून इंडिया हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली. इंडिया हा शब्द गुलामगिरीचा समानार्थी असून तो घटनादुरुस्तीने काढून टाकला पाहिजे, असे ते म्हणालेत. नरेश बन्सल यांनीही हरनाथ सिंह यांच्यासारखीच भूमिका मांडली आहे. एका देशाला दोन नावे असू शकतात का? असे या खासदारांचे म्हणणे आहे. इंडिया हे गुलामगिरीचे प्रतीक आहे, तर भारत ही आपल्या वारशाची ओळख आहे, असेही या खासदारांचे मत आहे.
आरएसएसने असेही म्हटले आहे – देशाचे एकच नाव असावे
गेले दोन दिवस हीच चर्चा होती, पण थोडं मागे गेलं तर RSS सुद्धा याच भूमिकेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी इंडियाऐवजी भारत या शब्दाचा वापर केला पाहिजे, असे म्हटले होते. लोकांनी ही सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. भारताचे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले असून ते पुढे नेले पाहिजे, असे ते म्हणाले. भागवत हे गेल्या शुक्रवारी सकल जैन समाजाच्या एका कार्यक्रमात पोहोचले होते. ते म्हणाले, “आपल्या देशाचे नाव शतकानुशतके भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते.”
हेही वाचा >> ‘…तरच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या’, विजय वडेट्टीवारांची भूमिका काय?
‘भारत’ शब्दाचा वापर थांबवावा लागेल’
“आपला देश भारत आहे आणि आपण ‘इंडिया’ हा शब्द वापरणे बंद केले पाहिजे आणि सर्व व्यावहारिक क्षेत्रात भारत वापरण्यास सुरुवात केली पाहिजे, तरच बदल घडेल. आपण आपल्या देशाला भारत म्हणावे आणि इतरांनाही समजावे.” एकात्मतेच्या सामर्थ्यावर भर देताना भागवत म्हणाले की, भारत हा सर्वांना एकत्र करणारा देश आहे आणि ते म्हणाले, आज जगाला आपली गरज आहे. आपल्याशिवाय जग चालू शकत नाही. योगाच्या माध्यमातून आपण जग जोडले आहे.
ADVERTISEMENT