Sushil Modi : समान नागरी कायदा 2024 लोकसभा निवडणुकीआधी लागू होणार? भाजप नेता म्हणाला…

प्रशांत गोमाणे

04 Oct 2023 (अपडेटेड: 04 Oct 2023, 03:37 PM)

इंडिया टूडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये सुशील मोदी यांनी समान नागरी कायद्यावर मोठं विधान केले. समान नागरी कायदा हा भाजपच्या जाहिरनाम्याचा भाग आहे. त्यात 2024 च्या लोकसभेला आता सहा महिनेच उरले आहेत.

india today conclave 2024 bjp mp sushil modi big statement on uniform civil code loksabha election

india today conclave 2024 bjp mp sushil modi big statement on uniform civil code loksabha election

follow google news

India Today Conclave Mumbai MP Sushil modi : इंडिया टूडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी आणि एमआयएमचे प्रमुख असुदद्दीने ओवेसी  (Sushil modi) यांनी समान नागरी कायद्यावर चर्चा केली. या चर्चेत सुशील मोदी यांनी समान नागरी कायदा (uniform civil code) देशभरात कधी लागू होणार याची माहिती दिली आहे. खरं तर हा कायदा निवडणूकीआधी किंवा निवडणूकीनंतर लागू होईल, असे अनेक कयास बांधले जात होते. मात्र आता सुशील मोदी यांनी या समान नागरी कायद्याबाबत मोठी माहिती दिली आहे.(india today conclave 2024 bjp mp sushil modi big statement on uniform civil code loksabha election)

हे वाचलं का?

इंडिया टूडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये (India Today Conclave Mumbai) सुशील मोदी (Sushil modi) यांनी समान नागरी कायद्यावर मोठं विधान केले. समान नागरी कायदा हा भाजपच्या जाहिरनाम्याचा एक भाग आहे. त्यात 2024 च्या लोकसभेला आता सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे हे बिल आमच्या जाहिरनाम्याचा भाग असल्याने आम्ही ते पुर्ण करण्याचे काम करू, असा विश्वास सुशील मोदी यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : अभिनेता रणबीर कपूरला ईडीची नोटीस; टायगर श्रॉफ, सनी लिओनीही ‘रडार’वर

तसेच सुशील मोदी यांना हे आगामी अधिवेशनात लागू होईल का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर कोणत्या अधिवेशनात होईल हे सांगता येत नाही. मी आशावादी आहे, मी काही सरकार नाही,असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

आदिवासींना का वगळले?

समान नागरी कायद्यातून आदिवासी समाजाला वगळण्यात आले आहे. आदिवासींना समान नागरीक कायद्याच्या बाहेर ठेवले पाहिजे. कारण त्यांची कुणाशीच तुलना होत नाही. कारण तुम्ही आदिवासींची तुलना ख्रिश्चन, मुस्लिम,हिंदुंशी करू शकत नाही. पक्षाचे काय मत आहे, हे मला माहित नाही पण माझे व्यक्तिगत मत असल्याचेही सुशील मोदी यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : विठूरायाच्या महापुजेचा मान कुणाला? फडणवीस की अजितदादा? दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे…

हिंदुमध्ये महिलांना संपत्तीचा अधिकार नव्हता. 2005 मध्ये संशोधन करून तो देण्यात आला. जर अजूनही महिलासाठी भेदभाव आहे, तर आम्ही हा भेदभाव संपवायला तयार आहोत. स्त्री आणि पुरूषांबाबत कोणताही कायदा तयार करायचा असेल तरीही आम्ही तयार आहोत. पण मुस्लिमांनी ही त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे,असे देखील सुशील मोदी म्हणाले आहेत.

    follow whatsapp