Dhananjay Munde Latest News: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. हे प्रकरण ताजं असतानाच धनंजय मुंडे कौंटुबिक प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी न्यायालयात केला होता. याप्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केल्याची माहिती समोर आलीय. परंतु, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे याने एक पोस्ट करून खळबळ उडवली आहे.
ADVERTISEMENT
शिशिव धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
"मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे.माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची.
हे ही वाचा >> Beed : वाल्मिकच्या समर्थकांनी ज्याला बेदम मारलं तो बीड पोलिसांचा 'होमगार्ड', धक्कादायक माहिती समोर
जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा. माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता.
2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत.माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते. शिशिव धनंजय मुंडे...", असं शिशिव मुंडे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Dhananjay Munde कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी? मोठा धक्का, न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
ADVERTISEMENT
