Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: App वरून असा भरा अर्ज, 'या' चुका टाळा!

मुंबई तक

05 Jul 2024 (अपडेटेड: 05 Jul 2024, 03:24 PM)

Majhi Ladki Bahin Yojana App online Apply: नारीशक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अर्ज भरताना चुका कशा टाळायच्या याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घ्या

App वरून असा भरा अर्ज, 'या' चुका टाळा!

App वरून असा भरा अर्ज, 'या' चुका टाळा!

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता App वर

point

महिलांना दरमहा मिळणार 1500 रुपये

point

जाणून घ्या अर्ज भरताना कोणत्या चुका टाळाव्या

Majhi Ladki Bahin Yojana App: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासूनच याचा लाभ मिळविण्यासाठी महिलांनी शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामधून अनेक अडचणींचा महिलांना सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी लाच घेण्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. यामुळे या गोष्टींना आळा बसावा यासाठी सरकारने या योजनेसाठी एक अ‍ॅप देखील आणलं आहे. (know in detail how to apply online for majhi ladki bahin yojana on narishakti doot app and how to avoid mistakes while filling application)

हे वाचलं का?

आता याच अ‍ॅपवरून नेमका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

नारीशक्ती दूत App / Nari Shakti App Fill the application form  

स्टेप 1:

सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा. अ‍ॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर 'नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.' असा मेसेज दिसेल 

स्टेप 2:

यानंतर तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा. 

स्टेप 3:

लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या अ‍ॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा. 

स्टेप 4:

यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा. 

स्टेप 5:

त्यानंतर इथे महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान असायला हवं. 

स्टेप 6:

त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावं लागेल. तसंच तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडावी. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. तसंच यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल. 

स्टेप 7:

पुढे तुम्हाला अशी माहिती विचारण्यात येईल की, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा. 

स्टेप 8:

यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा. 

स्टेप 9:

यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल. 

स्टेप 10: 

त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा. त्यानंतर माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.

अर्ज भरताना 'या' चुका टाळा

1. अर्जदार महिलेचं आधारकार्डवर जे नाव आहे तेच नाव या योजनेचा अर्ज भरताना असायला हवं. जर नावामध्ये तफावत आढळली तर तुमचा अर्ज पात्र ठरू शकत नाही. 

2. शासनाने ज्या कागदपत्रांची यादी दिली आहे. त्या कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाइलमध्ये असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही अ‍ॅपमध्ये ही कागदपत्रं अपलोड करू शकत नाहीत. 

3. अ‍ॅपमधून अर्ज भरताना अर्जदार महिलांना बँक खात्याची नेमकी माहिती द्यावी लागेल. आपला बँक खाते क्रमांक हा अचूक आहे याची खात्री करूनच तुम्ही अर्ज सब्मिट करा. 

    follow whatsapp