Mahanand Dairy : '...तर मी राजकीय संन्यास घेईन', मंत्री विखेंचे राऊतांना चॅलेंज

मुंबई तक

• 05:30 PM • 22 Feb 2024

Radhakrishna vikhe vs sanjay raut : महानंदाची गोरेगाव येथील 50 एकर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंवर केला होता. या आरोपांवर उत्तर देताना राधाकृष्ण विखे म्हणाले, संजय राऊत यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे आपण राजकीय संन्यास घेऊ, असे थेट प्रतिआव्हानच त्यांनी दिले आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले, संजय राऊत यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे आपण राजकीय संन्यास घेऊ, असे थेट प्रतिआव्हानच त्यांनी दिले आहे. इतकेच नाही तर संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मंत्री विखेंनी सांगितले.

mahanand dairy controversy radhakrishna vikhe direct challenge to sanjay

follow google news

Radhakrishna vikhe vs sanjay raut : रोहित वाळके, अहमदनगर :  महानंदाची गोरेगाव येथील 50 एकर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंवर केला होता. या आरोपांवर उत्तर देताना राधाकृष्ण विखे (Radhakrishna vikhe)  म्हणाले, संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे आपण राजकीय संन्यास घेऊ, असे थेट प्रतिआव्हानच त्यांनी दिले आहे. इतकेच नाही तर संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मंत्री विखेंनी सांगितले. (  mahanand dairy controversy radhakrishna vikhe direct challenge to sanjay raut maharashtra politics)
 
 संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की,  संजय राऊतांच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. त्यांना मानसोपचाराची गरज आहे. आजवर मी अनेकदा पथ्य पाळली आहेत, मात्र समोरील व्यक्ती जर आपली बदनामी करत असेल त्याचे परिणाम देखील त्यांना भोगण्याची तयारी ठेवावीच लागले, असा इशारा मंत्री विखेंनी दिला. तसेच संजय राऊतांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत मी राजकीय संन्यास घेईन, असे थेट चँलेजच मंत्री विखेंनी संजय राऊतांना दिले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Manoj Jarange : 'शरद पवारांचा फोन यायचा, आंदोलनाचा खर्चही...',

दरम्यान संजय राऊत कुठली पन्नास एकर जमीन म्हणत आहेत, ते जे काही आरोप करत आहेत त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे देखील मंत्री विखे यांनी सांगितले आहे. आता मंत्री विखेंच्या या आव्हानावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?

महानंदाच्या गोरेगाव येथील 50 एकर जमीन विक्रीसंदर्भात महसूल मंत्री विखे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन उप मुख्यमंत्री असे चौघेजण या व्यवहारातील सौदागर असल्याचा उल्लेख केला होता. 

    follow whatsapp