Maharashtra Voters Survey मुंबई : राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यानच राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला सरस मुख्यमंत्री कोण अशा अनेक प्रश्नांवर आधारित सर्व्हे करण्यात आला. 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने केलेल्या या सर्व्हेमध्ये महायुती सरकारचं काम आणि यापूर्वी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाबद्दल लोकांची मतं जाणून घेण्यात आली. यामध्ये राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रश्न विचारण्यात आले. (Maharashtra Voters Survey amid assembly elections 2024 manoj jarange maratha reservation)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 2019 च्या तुलनेत महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. भाजपच्या या कमी झालेल्या जागांचं गणित समजून घेताना महाराष्ट्र फार महत्वाचा ठरतो. त्यामुळेच आता राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडेही देशाचं लक्ष लागून आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेत. तर मनोज जरांगे यांनीही उमेदवार उतरवण्याबद्दल भाष्य केलं होतं.
हे ही वाचा>> Maharashtra Voters Survey : बेरोजगारी, भ्रष्टाचार की योजनांचा फायदा? शिंदे सरकारच्या 'या' गोष्टीची सर्वात जास्त चर्चा
गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या विषयावर मनोज जरांगे यांनी आंदोलन छेडलंय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचा प्रभाव नंतर पूर्ण मराठवाड्यावर पडला. सुरुवातीला झालेलं तीव्र आंदोलन, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या भेटीगाठी, नवी मुंबईपर्यंत आलेला मोर्चा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलकांच्या पदरी पडलेली निराशा असा सगळा घटानक्रम घडत गेला. यावरुन सुरूवातीच्या काळात महायुतीवर मोठी नाराजी दिसून आली होती. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचं भाजप नत्यांनी बोलूनही दाखवलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेला काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
हे ही वाचा>>Maharashtra Voters Survey : जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच? शिंदेंना बसणार धक्का? : सर्व्हे
मनोज जरांगे हे सध्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार असल्याचं चित्र आहे. रविवारी त्यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांच्या समर्थकांचा निवडणूक लढण्याचा सूर दिसून आला. मनोज जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्थापित राजकारण्यांना इशारा देत आहेत. मात्र जरांगे समर्थकांमध्ये अजूनही त्याबद्दल संभ्रम आहे. 100 पैकी 35 टक्के समर्थकांना असं वाटत नाही की, जरांगे निवडणुकीत उमेदवार उतरवतील. तर 40 टक्के उमेदवारांना वाटतंय की जरांगे उमेदवार उतरवतील. तर 20 टक्के लोकांनी याबद्दल मत व्यक्त केलं नाही.
मनोज जरांगे हे आरक्षणाच्या या आंदोलनात वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असतात. आरक्षणाची मागणी करतानाची त्यांची भूमिका पटते का असं विचारल्यावर त्यांचे 38 टक्के समर्थक म्हणतात ही भूमिका योग्य आहे. 28 टक्के समर्थक म्हणतात की, योग्य नाही आणि 34 टक्के समर्थकांनी याबद्दल मत न व्यक्त करणं पसंत केलं. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाबद्दलचा निर्णय माहिती असलेले 58 टक्के मराठा मतदार आढळले. तर 22 टक्के मतदारांना हा निर्णय माहिती नव्हता. तर 13 टक्के मराठा मतदारांना पक्की माहिती नव्हती.
हे ही वाचा>>Maharashtra Assembly Election 2024: 'महाशक्तीची' पहिली यादी जाहीर, बच्चू कडू, संभाजीराजे आणि शेट्टींची घोषणा!
त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता मराठा समाजाची मतं मागील वेळेस ही महायुतीकडे गेली नव्हती, मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं आहे. कारण यंदा मराठा समाज काहीअंशी महायुतीच्या बाजून जाऊ शकतो असं दिसतंय.
ADVERTISEMENT