Maharashtra Voters Survey : बेरोजगारी, भ्रष्टाचार की योजनांचा फायदा? शिंदे सरकारच्या 'या' गोष्टीची सर्वात जास्त चर्चा

मुंबई तक

21 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 04:25 PM)

Maharashtra Assembly Elections 2024 Survey: राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यानच राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती : सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज् आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये लोकांची मतं जाणून घेण्यात आली.

बेरोजगारी, भ्रष्टाचार ते दरवाढ... शिंदे सरकारबद्दल काय म्हणाले मतदार?

बेरोजगारी, भ्रष्टाचार ते दरवाढ... शिंदे सरकारबद्दल काय म्हणाले मतदार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभेला कोणत्या मुद्द्यांचा विचार करणार?

point

कोण-कोणत्या समस्यांमुळे मतदार नाराज?

point

विधानसभेला कुणाला बसणार फटका?

Maharashtra Assembly Elections Survey : काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत मोठा फटका बसला. भाजपच्या या कमी झालेल्या जागांचं गणित समजून घेताना महाराष्ट्र फार महत्वाचा ठरतो. त्यामुळेच आता राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडेही देशाचं लक्ष लागून आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेत. (Maharashtra Assembly Elections Public opinion Survey about cm eknath shinde  mahayuti government)

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Maharashtra Voters Survey : जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच? शिंदेंना बसणार धक्का? : सर्व्हे

 

राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या महायुतीचं सरकार आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील या सरकारने आपल्या कामाची छाप सोडण्यासाठी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक योजनांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी असलेल्या महाविकास आघाडीकडून पक्षफोडीचे आरोप करत भाजपला निशाण्यावर धरलं जातंय. 

राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यानच राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला सरस मुख्यमंत्री कोण अशा अनेक प्रश्नांवर आधारित सर्व्हे करण्यात आला. 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने केलेल्या या सर्व्हेमध्ये महायुती सरकारचं काम आणि यापूर्वी  असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाबद्दल लोकांची मतं जाणून घेण्यात आली. 

वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जनतेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच राज्यातील सामाजिक सलोख्य जपण्यासाठी आणि विकासासाठी उत्तम होतं असं वाटतंय. तर दुसरीकडे पाणी, वीज, रस्ते या सुविधा पुरवण्यासाठी मात्र शिंदे सरकारने उत्तम कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. 
 

बेरोजगारी आणि दरवाढीचीही चर्चा

हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 Live : शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, मातोश्रीवर वेगवान घडामोडी

 

मतदान करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार कराल असा प्रश्न केला असता जवळपास अर्ध्या मतदारांच्या तोंडून बेरोजगारीचा मुद्दा ऐकायला मिळाला. तसंच भ्रष्टाचार आणि दरवाढीची समस्या देखील मागच्या काही दिवसात वाढली असल्याचं मतदार म्हणत आहेत. मात्र यासाठी मतदार दोष कुणाला देतायत हे स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढल्याचं मतदारांकडून स्पष्टपणे बोललं जातंय.

एकूणच या संपूर्ण परिस्थितीमध्ये महायुतीला आपल्या योजनांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा मुद्दा घेऊन आक्रमकपणे प्रचार करत आहे. मतदार द्विधा मनस्थितीत असल्याचं दिसतंय. पण मतदार सरकारच्या कामाबद्दल समाधानी असले, तरी बेरोजगारी आणि दरवाढीच्या मुद्द्यावरून नाराजही आहेत. त्यामुळे या मुद्द्यांचा फटका बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp