Constituency Wise BJP Candidates List: ठाण्यात भाजपने दिलं 'या' दिग्गज नेत्याला तिकीट, पाहा कोण आहे उमेदवार

मुंबई तक

20 Oct 2024 (अपडेटेड: 20 Oct 2024, 07:07 PM)

Maharashtra Assembly Election 2024: भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या ठाणे या मतदारसंघासाठी भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे.

BJP constituency Thane candidate Name

BJP constituency Thane candidate Name

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली पहिली यादी

point

भाजपने कोथरुड मतदारसंघात कोणाला दिली उमेदवारी?

point

भाजपने 99 जणांची यादी केली प्रसिद्ध

Maharashtra Assembly Election 2024 | Constituency Wise BJP Candidates List: पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 99 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. ठाणे मतदारसंघात भाजपने कुणाला तिकीट दिली? याबाबत जाणून घ्या

हे वाचलं का?

ठाण्यात भाजपचा उमेदवार कोण? 

ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे भाजपने मागील निवडणुकीत हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी महायुतीकडून संजय केळकर विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून संजय केळकर यांनाच उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत केळकर विजयी झेंडा फडकवतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. 

हे ही वाचा >> Constituency Wise BJP Candidates List: कोल्हापूर दक्षिणमधून भाजपने दिलं 'या' दिग्गज नेत्याला तिकीट, पाहा कोण आहे उमेदवार?

महाराष्ट्राची सत्ता राखण्याचं भाजप समोर आव्हान

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप युतीला भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे त्यांचे विक्रमी खासदार निवडून आले होते. मात्र, 2024 निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने सपशेल नाकारलं. 

लोकसभेतील कामगिरी ही भाजपसाठी एका अर्थाने धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच परिणिती म्हणजे आजची ही पहिली यादी आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत.

    follow whatsapp