Sanjay Raut Press Conference : महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवत आहेत. या योजनेच्या पैशांवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना टर्निंग पॉईंट ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अजिबात नाही. कदाचित त्यांच्यासाठी तो यू टर्न ठरेल. टर्निंग पॉईंट वगैरे काही नाही. अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्या आहेत. ही नवीन योजना नाही. त्यांनी फार मोठी क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आल्या आहेत. फडणवीस, अजित पवार आणि मिंधे दीड हजार रुपये खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला पैसा आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर पंधराशेचे आम्ही तीन हजार करु. हा आमचा शब्द आहे, असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
श्रीकांत शिंदेंच्या टीकेला राऊतांचं सडेतोड उत्तर
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केलीय, मशाल हातात घेण्यासाठी यांच्यात दम नाही. मशाल माकडाच्या हाती, यावर प्रतक्रिया देताना राऊत म्हणाले, ज्याला उद्धव ठाकरे साहेबांनी खासदार केलं. त्याची डॉक्टरकीची प्रमाणपत्रे तपासा. चोरलेला धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे ना, तो लोकसभेत त्यांच्या छातीवर पडलेला आहे. रावण जेव्हा धुनष्यबाण उचलतो, तेव्हा तो त्याच्या छातीवर पडला आहे. ही रावणाची औलाद आहे. झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक पुढं ढकलली आहे. हे लोक चार राज्यांची निवडणूक एकत्र घेऊ शकत नाहीत आणि ते देशात वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतात.
हे ही वाचा >> Anil Deshmukh : शरद पवारांनी 'तो' इशारा दिला होता, नाशिकच्या हिंसाचाराच्या घटनेवर अनिल देशमुख काय म्हणाले?
CM एकनाथ शिदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर राऊतांचा घणाघात
आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर येईल, त्यानंतर कॅम्पेन होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे कोणता चेहरा असेल, तर त्यांनी समोर आणावा, मी त्यांना पाठिंबा देईल. महायुती मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा दाखवतेय का? आजचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री राहतील का? दिल्लीवरून विनोद तावडे येणार आहेत का? असे सवाल उपस्थित करत राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.
हे ही वाचा >>Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे
तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना, मग सुरुवात करा. देवेंद्र फडणवीसांनी या चार राज्यांच्या निवडणुका घेण्याची मागणी करावी. लाल किल्ल्यावरून मोदी खोटं बोलतात. लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री आहे. वन नेशन वन इलेक्शन..पण महाराष्ट्राचं इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही. चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही, असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT