Maratha Reservation, Manoj Jarange Patil Agitation Antarawali Sarati : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) मिळवून देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. तत्पुर्वी गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दिलाय.पण माध्यमांशी बोलताना त्यांचे हात थरथर कापत होते, बोलताही येत नसल्याची अवस्था होती. अशात अनेकजण जरांगे पाटलांची भेट घेत आंदोलनाला समर्थन देत आहे. त्यात आता एक मराठा आंदोलक महिला(आरोग्य सेविका) रेखा पाटील यांनी थेट ‘मी विष पिऊन मरते, पण माझ्या भावाचा जीव वाचवा’, असा हंबरडा फोडत सरकारला आरक्षणावर तोडगा काढण्याची विनंती केली. (maratha reservation manoj jarange patil agitation protest six days maratha women angree eknath shinde government)
ADVERTISEMENT
‘मी स्वत: आरोग्य सेविका आहे, मी खूप गंभीर रूग्ण हाताळलेत. पण इथल्या डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिला आंदोलक आरोग्य सेविकेने रडत रडत केला आहे. जरांगे पाटील पुर्ण डिहायड्रेट झाले आहेत. त्यांची एक-एक पेशी तुटत मरायला लागली आहे. त्यामुळे मी इथे विष पिऊन मरते, पण त्यांची ट्रीटमेंट करा असा हंबरडा फोडत मराठा आंदोलक महिला बोलताना दिसते आहे. तसचे आता आम्हाला आरक्षण महत्वाचं नाही, माझा भाऊ महत्वाचा आहे. माझ्या भावावर उपचार करा आणि माझ्या भावाला वाचवा,असेही महिलेने सांगितले.
हे ही वाचा : Crime : पत्नीचे भाच्यासोबतच संबंध, मुंबईला गेली पळून; पतीने लेकरांना दिली विषारी बिस्किटं अन्…
माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं, तर मी स्वता: तलवार घेऊन येईन आणि घरात घुसून सगळ्यांना मारेन, असा इशारा देखील मराठा आंदोलक महिलेने दिला आहे. सरकार 40 दिवस झाल्यावर दिल्लीला गेले, म्हणजेच हे कोणत्याचे गोष्टींवर गंभीर नाही. यांनी 40 दिवस काय केले, याचे उत्तर द्यावे. या (सरकारला) आरक्षण द्यायचं नाही. माझ्या भावाचा जीव घ्यायचा आहे, असाही आरोप मराठा आंदोलक महिलेने सरकारवर केला.
सरकारला काय पाहिजे होते, पुरावे पाहिजे होते. आपलं कुठं अडलं होतं, आपल्याला त्यांनी जीआर दिला होता. ज्यांची वंशावळ आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार होतं. मग आम्ही आमच्या वंशावळीचे 15 हजार पुरावे दिले.मग आता यांना आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी आहोत, हे पुरावे पाहिजे का? असा खडा सवाल देखील मराठा आंदोलक महिलेने उपस्थित केला.
हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि…”, शरद पवारांनी बोलून दाखवली भीती
जरांगे पाटील जर आपल्या समोर तडफडून मरत असतील, तर आपण त्यांना तडफडून मरताना बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे. हे स्पष्ट झालंय, कारण त्यांना वेळ देऊनही त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप देखील मराठा आंदोलक महिलेने केला.
ADVERTISEMENT