Vidhan Parishad Ambadas Danve: मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल (1 जुलै) विधानपरिषदेत तुफान राडा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. पण आता याचप्रकरणी अंबादास दानवे यांच्याविरोधात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मोठी कारवाई केली आहे. (monsoon session maharashtra vidhan parishad big action against ambadas danve for abusing bjp mla prasad lad)
ADVERTISEMENT
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील एका विधानवरुन काल महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत रण पेटलं होतं. राहुल गांधींच्या याच भाषणावर अंबादास दानवेंनी आपली विरोधी पक्षनेते दानवेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. पण त्याचवेळी वाद एवढा पेटला की, अंबादास दानवे यांनी भर सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. ज्यावर बराच गदारोळ झाला आणि त्यामुळेच आज (2 जुलै) दानवेंवर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या खेळीने मोठा ट्विस्ट! 'या' नेत्याला तिकीट
अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात यावं यासाठी प्रसाद लाड यांनी आज एकट्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. ज्यानंतर आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं आहे. त्यामुळे आता पुढील 5 दिवस विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेच नसतील.
निलंबनानंतर विरोधकांचा गदारोळ
दरम्यान, नीलम गोऱ्हेंनी केलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी सभागृहा बराच गदारोळ केला. या प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी केली जात होती. यावेळी उपसभापतीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याच सभागृहात हजर होते. त्यावर त्यांनी भूमिका मांडताना म्हटलं की, 'हा ठराव चर्चेचा ठराव नसतो. या ठरावावर आपण मतदान घेतो. तसं आपण मतदान घेतलेलं आहे. जी कारवाई नियमानुसार व्हायला हवी ती कारवाई नियमानुसार झालेली आहे.' असं म्हणत फडणवीसांनी या कारवाईचं समर्थन केलं.
विधानपरिषदेत नेमकं काय घडलेलं?
राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव विधानपरिषदेत करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उभे राहिलेले.
हे ही वाचा>> Maharashtra Breaking News Live : शिंदेंचे मविआला चिमटे, विधानसभेत विरोधकांवर चढवला हल्ला
सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे की, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं.. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये...'
'ये तू हात नाही करायचा.. माझ्याकडे हात नाही करायचा.. तिकडे करायचा.. तिकडे करायचा.. भ@ तिकडे करायचा.. मा$&@#'
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर सभागृह तहकूब करण्यात आलं. पण त्यानंतर प्रसाद लाड हे अत्यंत संतप्त झालेले दिसून आले होते. विरोधी पक्षनेते दानवेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीच त्यांनी यावेळी केली. तसंच राजीनामा होणार नाही तोवर सभागृह चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
ADVERTISEMENT