Mood of the Nation: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?, देशातील जनतेचा काय आहे मूड?

मुंबई तक

24 Aug 2023 (अपडेटेड: 24 Aug 2023, 03:04 PM)

Mood of the Nation Survey: इंडिया टुडेने Mood of the Nation या सर्व्हेच्या माध्यमातून देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जनतेने किती टक्के पसंती दिली आहे.

mood of the nation survey will narendra modi become the prime minister again what is the mood of the people of the country political news headlines india

mood of the nation survey will narendra modi become the prime minister again what is the mood of the people of the country political news headlines india

follow google news

Mood of the Nation LIVE: नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election सर्व पक्षांनी तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत इंडिया टुडेने देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मूड ऑफ द नेशन’मध्ये (Mood of the Nation) आम्ही जनतेला मोदी सरकारच्या उणिवांबद्दल प्रश्न विचारले. आगामी निवडणुकीपूर्वी मोदी सरकार कुठे मात खात आहे हे जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्ना केला. याबाबत इंडिया टुडे सी-व्होटरचे सर्वेक्षण आहे जे 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघात करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 25,951 जणांनी आपले मत मांडले. (mood of the nation survey will narendra modi become the prime minister again what is the mood of the people of the country political news headlines india)

हे वाचलं का?

या सर्वेक्षणादरम्यान एनडीए सरकारच्या कामकाजाबाबत वेगवेगळ्या वेळी जनतेकडून प्रश्न विचारण्यात आले होते. एनडीए सरकारची कामगिरी कशी आहे हे आम्हाला जनतेकडून जाणून घ्यायचे होते. त्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये 72 टक्के जनता सरकारच्या कामावर खूश होती, तर 9 टक्के जनता सरकारच्या कामावर नाराज होती.

जानेवारी 2021 मध्ये जेव्हा जनतेला हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 66% लोकांनी सरकारच्या कामावर सहमती दर्शवली होती, तर 11% लोक NDA सरकारच्या कामावर नाराज होते. ऑगस्ट 2021 मध्ये जेव्हा हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला तेव्हा 55 टक्के लोक एनडीए सरकारच्या कामावर खूश होते, तर 17 टक्के लोक जनतेच्या कामावर नाराज होते.

जानेवारी 2022 मध्ये 59 टक्के लोक एनडीए सरकारच्या कामावर समाधानी होते, तर 26 टक्के लोक सरकारच्या कामावर नाराज होते. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये पुन्हा जनतेला सरकारच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा 56 टक्के लोकांनी आनंद व्यक्त केला तर 32 टक्के लोकांनी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती.

हे ही वाचा >> Crime News : प्रेमात वेडा झाला अन् मर्डर केला, गर्लफ्रेंसाठी तरुणाला घातल्या गोळ्या

जानेवारी 2023 मध्ये हाच प्रश्न पुन्हा जनतेला विचारण्यात आला, तेव्हा 67 टक्के लोक सरकारच्या कामावर खूश होते, तर 18 टक्के लोक सरकारच्या कामावर नाराज होते. यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये अंतिम फेरीत जनतेला प्रश्न विचारण्यात आले. यावेळी 59 टक्के लोक एनडीए सरकारच्या कामावर खूश होते, तर 19 टक्के लोक नाराज होते.

NDA सरकारचे सर्वात मोठे यश कोणते?

या सर्वेक्षणादरम्यान, आम्ही जनतेला एनडीए सरकारच्या सर्वात मोठ्या यशाबद्दल विचारले. 21 टक्के लोकांनी कोविड-19 चे उत्तम व्यवस्थापन असल्याचे सांगितले. 13 टक्के लोकांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवत असल्याचे सांगितले. तर 12 टक्के लोक कलम 370 हटवणे हे सर्वात मोठं यश मानत आहेत.

एनडीए सरकारचे अपयश काय?

या सर्वेक्षणादरम्यान, आम्ही जनतेला एनडीए सरकारचे सर्वात मोठ्या अपयशाबद्दल विचारले. तेव्हा 25 टक्के लोकांनी किंमती वाढणे (महागाई) सरकारचे अपयश असल्याचे सांगितले. 17% लोकांनी बेरोजगारी हे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 12% लोकांनी आर्थिक विकासाला अपयश म्हटले आहे.

देशातील सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत?

सर्वेक्षणात, जेव्हा लोकांना सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा 24 टक्के लोकांनी किंमतीत वाढ हा महत्त्वाचा मुद्दा मानला. त्याच वेळी, 24 टक्के लोक होते ज्यांनी बेरोजगारी ही समस्या मानली. याशिवाय 8 टक्के लोकांनी गरिबी हा महत्त्वाचा मुद्दा मानला.’

हे ही वाचा >> Chandrayan 3 Prakash Raj tweet : चांद्रयान-3 वर ‘चायवाला’च्या जोकमुळे ट्रोल झालेल्या प्रकाश राजने लँडिंगनंतर केलं ‘हे’ ट्वीट

पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी कशी?

जानेवारी 2021 मध्ये, 74 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या कामाचे वर्णन चांगले केले होते, तर 8 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या काम वाईट असल्याचं म्हटलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये जेव्हा हाच प्रश्न पुन्हा विचारण्यात आला तेव्हा 54 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या काम चांगलं म्हटलेलं तर 16 टक्के लोकांनी काम खराब असल्याचे सांगितले होते. जानेवारी 2022 मध्ये 63 टक्के लोकांनी चांगले आणि 21 टक्के लोकांनी वाईट काम असल्याचं म्हटलेलं.

ऑगस्ट 2022 मध्ये, 66 टक्के लोकांनी मोदींचं काम चांगलं असल्याचं म्हटलं होतं, तर 26 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे काम वाईट असल्याचे म्हटले होते. जानेवारी 2023 मध्ये 72 टक्के लोकांनी चांगले आणि 16 टक्के लोकांनी खराब कामिगरी म्हटली होती. ऑगस्ट 2023 मध्ये, 63 टक्के लोकांनी चांगले म्हटले आहे आणि 22 टक्के लोकांनी पीएम मोदींची कामगिरी खराब असल्याचे म्हटले आहे.

एकंदरीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी कशी आहे?

सर्व वर्षांचे आकडे एकत्र घेतल्यास, 63 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी चांगली असल्याचे म्हटले आहे तर 13 टक्के लोकांनी बरी कामगिरी असल्याचे म्हटलं आहे. त्याच वेळी, 22 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कामगिरीचे वर्णन खराब असं केलं आहे.

    follow whatsapp