पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना काम यशस्वी होण्याचा मंत्र दिला आणि त्याचवेळी 2024 च्या निवडणुकीसाठी पक्षाचा अजेंडा निश्चित केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर आपण मुस्लिम बंधू-भगिनींकडे पाहिले, तर व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्यांनी पसमांदा मुस्लिमांचे जगणे कठीण केले आहे. त्यांना उद्ध्वस्त केले आहे.”
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्यांच्याच धर्मातील एका वर्गाने पसमांदा मुस्लिमांचे इतके शोषण केले आहे, परंतु देशात त्याची चर्चा कधीच झाली नाही. त्याचा म्हणणं ऐकायलाही कुणी तयार नाही. पसमांदा मुस्लिमांना आजही समान दर्जा मिळालेला नाही. भठियारा, जोगी, मदारी, जुलाहा, लंबाई, तेजा, लहरी, हलदर या पसमांदा जातींशी एवढा भेदभाव करण्यात आला आहे की, अनेक पिढ्यांना त्यांचे नुकसान सहन करावे लागले आहे.”
हेही वाचा >> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!
पीएम मोदी म्हणाले की, भाजप सरकार त्यांना पक्के घर, मोफत आरोग्य सुविधाही देत आहे. आम्ही त्यांच्याशीही आत्मविश्वासाने बोलू आणि त्यांचा संभ्रम दूर करू. पंतप्रधान मोदींनी समान नागरी संहिता (यूसीसी) आणि तिहेरी तलाकचाही उल्लेख केला. त्यांनी विरोधकांवर UCC बद्दल संभ्रम पसरवल्याचा आरोप केला आणि आम्ही त्यांचा सर्व गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
पसमांदा मुसलमान कोण आहेत?
मुस्लिमांमध्ये पसमांदा मुस्लिम सामाजिक आणि आर्थिक तसेच राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप मागासलेले आहेत. देशातील मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 85 टक्के लोक पसमांदा आहेत, तर 15 टक्के सवर्ण मुस्लिम आहेत. दलित आणि मागासवर्गीय मुस्लिम पसमांदा श्रेणीत येतात. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातही हिंदूंप्रमाणेच जातिव्यवस्था आहे. पसमांदा हा मूळचा पर्शियन शब्द आहे, ज्याचा अर्थ सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक असा होतो.
हेही वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’
पुढारलेल्या मुस्लिम जाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. राजकारणाबद्दल बोलायचे झाले, तर या भागातही सवर्ण मुस्लिम जातीचे वर्चस्व आहे. पसमांदा समाज नेहमीच उपेक्षित राहिला आहे आणि यामुळेच पंतप्रधान मोदी वारंवार पसमांदा मुस्लिमांबद्दल बोलत आहेत. मुस्लिमांमध्ये बहुसंख्य असलेल्या पसमांदाकडे दुर्लक्ष झाले असून, कल्याणकारी सरकारी योजनांचा लाभ देऊन त्यांना सहज जवळ आणता येईल, असे भाजपला वाटते.
पसमांदा मुस्लिमामध्ये कोणत्या जाती आहेत?
मुस्लिमांच्या ओबीसी विभागात कुंजडे (राईन), जुलाहे (अन्सारी), धुनिया (मन्सूरी), कसाब (कुरेशी), फकीर (अल्वी), नाई (सलमानी), मेहतर (हलालखोर), ग्वाला (घोसी), धोबी, गड्डी, लोहार-सुतार (सैफी), मनिहार (सिद्दीकी), शिंपी (इद्रीसी), वन-गुजर, गुर्जर, बंजारा, मेवाती, मलिक गाढे, जाट, अल्वी, या जाती येतात. पसमांदा मुस्लिम देखील विविध जातींमध्ये विभागले गेले आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न भाजपकडून 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकभा निवडणुकीच्या निमित्ताने केला जात आहे.
ADVERTISEMENT