Amol Mitkari Vs Ashish shelar : नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पूकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलं आहे. अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ''हिंदू मोर्चामुळे ज्यांची पोट दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा'', असे विधान केले होते. या विधानावर आता ''शेलारांनी सोलून काढा ही भाषा करू नये, या असवैधानिक भाषा असल्याचे अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. (nashik hindu protest amol mitkari vs ashish shelar ramgiri maharaj statement maharashtra politics)
ADVERTISEMENT
बांग्लादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराविरोधात आज हिंदू संघटनांनी नाशिक बंदची हाक दिली होती. या बंदला गालबोट लागल्याचं चित्र आज नाशिकमध्ये दिसलं. कारण नाशिकच्या अनेक भागात दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर तणावसदृष्य परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली होती.
नाशिकमधील हिंदू मोर्चावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था कुणी हातात घेऊ नये. ज्यांनी कुणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, ज्यांनी दगडफेकीची सुरूवात केली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
हे ही वाचा : Uddhav Thackeray: मविआने रणशिंग फुकलं! ठाकरेंचा मित्रपक्षांनाच क्लिअर 'मेसेज'
सकल हिंदू समाज येथे मोर्चा काढणार नाही तर कुठे काढणार, सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल तर त्यांचं स्वागत आहे. या मोर्चामुळे ज्यांची पोट दुखत असतील तर त्यांच्या पाठी सोलून काढा, असे आवाहन आशिष शेलारांनी पोलिसांना केला आहे.
दरम्यान या मोर्चावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था आणि कुणाच्या धर्माबाबत चिथावणीचे वक्तव्य,यामुळे दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते आणि शांतता भंग होते, असे प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात घडू नये. राष्ट्रवादीची काँग्रेसची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे. महायुतीत काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढा ही भाषा करूच नये, सोलून काढा, ठोकून काढू, मारून काढू, अशा भाषा या असवैधानिक आहेत. पण आशिष शेलार कशावर बोलले हे पाहावं लागेल, पण कृपा करून त्यांनी असे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT