Nilesh Lanke : अजित पवारांची सोडणार साथ, निलेश लंकेंनी सांगितलं त्यांच्या मनात काय?

प्रशांत गोमाणे

11 Mar 2024 (अपडेटेड: 11 Mar 2024, 04:23 PM)

Nilesh Lanke Join NCP Sharad Pawar? : निलेश लंकेनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'मला अनेकांचे फोन आले आहेत, लोकसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे. आपण खेळाडू आहे, खेळाडू हा नेहमी ग्राउंडवर असतो. पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी लढेन असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त केला आहे.

nilesh lanke ncp ajit pawar likely to join sharad pawar ncp speculatiom ncp politics maharashtra politics

'मला अनेकांचे फोन आले आहेत, लोकसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे.

follow google news

Nilesh Lanke Join NCP Sharad Pawar? : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे. अजित पवारांचे अत्यंत विश्वासू नेते पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. निलेश लंके (Nilesh Lanke) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राम राम ठोकून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षात सामील होऊन तुतारी हाती घेणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अखेर या चर्चेवर निलेश लंके यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. ( nilesh lanke ncp ajit pawar likely to join sharad pawar ncp speculatiom ncp politics maharashtra politics) 

हे वाचलं का?

निलेश लंके प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना निलेश लंकेनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'मला अनेकांचे फोन आले आहेत, लोकसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे. आपण खेळाडू आहे, खेळाडू हा नेहमी ग्राउंडवर असतो. पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी लढेन असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त करत,'राजकारण कधी कुठे टर्न घेईल हे सांगता येत नाही' असे विधान करून लंकेंनी प्रवेशांच्या चर्चांना आणखीणच हवा दिली.

हे ही वाचा :  "अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीये", शिंदेंच्या नेत्याने थोपडले दंड

तसेच महायुतीच जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरील विषय आहे. मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे शेवटच्या घटकाने इतक्या उच्च स्तरावर चर्चा न केलेली बरीच असे निलेश लंकेंनी म्हटले. तसेच प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपआपल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहतो. काल माझ्या वाढदिवसानिमित्तही मला दादांचा फोन आल्याचेही निलेश लंके यांनी सांगितले. 

दरम्यान पत्रकारांनी यावेळी शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा सवाल निलेश लंके यांना केला होता. यावर लंके म्हणाले की, 'अजून तरी असं काही ठरलेलं नाही आणि आम्ही काही विचारही केलेला नाही. मी कोणाला भेटलोच नाही अशी विनाकारण चर्चा सुरू असल्याचे लंकेंनी शरद पवार गटात प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या. 

हे ही वाचा :  Electoral Bonds : "उद्याच माहिती द्या", सुप्रीम कोर्टाने एसबीआयला झापले

रद पवार गटात प्रवेशाच्या चर्चानंतर निलेश लंकेंचा फोन नॉटरिचेबल येत होता. यावर लंके म्हणाले की, माझा काल वाढदिवस असल्याने सकाळी 5.30 वाजेपर्यंत मी जागा होतो. त्यानंतर मी गाडीतच झोपलो होतो.त्यामुळे काही गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला भेटलो असल्याचे निलेश लंके यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान बॅनरबाजीवर बोलताना लंके म्हणाले की, कार्यकर्त्यांना जे वाटतं ते ते करत असतात. माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे बॅनर लावला असता तर त्यांना आमच्या नेतृत्वाचे फोटो टाकावे लागले असते. काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणाले काहीतरी होणार आहे. पण मलाच माहिती नाही.या सगळ्यांना अंतर्यामी समजायला पाहिजे, असे देखील निलेश लंके म्हणाले आहेत. 

    follow whatsapp