Nitish Kumar took oath as Chief Minister of Bihar : नितीश कुमार यांनी आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासोबत आणखी आठ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांचाही समावेश आहे. या शपथविधीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट केला आहे. माझ्या स्वतःच्या वतीने आणि बिहारच्या सर्व जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, असे नितीश कुमार यांनी ट्वीट केले आहे.(nitish kumar took oath as chief minister of bihar pm narendra modi bihar political crisis)
ADVERTISEMENT
नितीश कुमार यांनी शपथविधीनंतर एक्स या सोशल मीडियावर ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. या ट्विटमध्ये ते काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊयात.
माझ्या स्वतःच्या वतीने आणि बिहारच्या सर्व जनतेच्या वतीने मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.बिहारमध्ये एनडीए आघाडीसोबत नवे सरकार स्थापन झाले आहे. जनता ही आमची मालक आहे आणि त्यांची सेवा करणे हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. केंद्र आणि राज्यात एनडीए आघाडीचे सरकार आल्याने विकासकामांना गती मिळेल आणि राज्यातील प्रश्न सुटतील, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
आज आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही मंत्री लवकरच शपथ घेतील. मी मुख्यमंत्री पदी शपथ घेतली असून माझ्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं आहे, अशी माहितीही नितीश कुमार यांनी दिली.आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी जिथं होतो तिथंच (NDA) परत आलो आहे. आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते पुढे म्हणाले.
ADVERTISEMENT