Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार अत्यंत विचित्र, 'हे' आहे कारण

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 06:43 PM)

संख्याशास्त्राच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीकडे पाहताना काही रंजक गोष्टी समोर येतात. त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक अतिशय खास ठरणार असून, फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर या निवडणुकीचे परिणाम होणार असंही दिसतंय.

विधानसभा निवडणूक आणि संख्याशास्त्र

विधानसभा निवडणूक आणि संख्याशास्त्र

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातले राजकीय पक्षांची स्थिती सध्या काय?

point

संख्याशास्त्र निवडणुकीबद्दल काय सांगतंय?

point

निवडणुकीत काय निकाल येणार?

Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातले सर्व पक्ष सध्या दंड थोपटून मैदानात उतरलेत. महाविकास आघाडीची स्थापना, त्यानंतर मविआचं सरकार कोसळलं, शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादीत फूट पडली, शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवे चिन्ह मिळाले अशा अनेक गोष्टी मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडून गेल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे देशाचं लक्ष सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर लागून आहे. याच निमित्ताने संख्याशास्त्र या निवडणुकीबद्दल काय सांगतं ते जाणून घेण्याचीही अनेकांची उत्सुकता आहे. (Numerology and astrology predictions on Maharashtra vidhan sabha elections) 

हे वाचलं का?

संख्याशास्त्राच्या माध्यमातून या निवडणुकीकडे पाहताना काही रंजक गोष्टी समोर येतात. त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक अतिशय खास ठरणार असून, फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर या निवडणुकीचे परिणाम होणार असंही दिसतंय.

राज्यातले पक्ष आणि त्यांची सद्यस्थिती

हे ही वाचा>> Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत येणार धक्का देणारा निकाल? संख्याशास्त्र काय सांगतंय?

राज्यात सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या आमदारांचा आकडा 180 च्या वर जातो.

संख्याशास्त्राशी 288 चा संबंध

अंकशास्त्रानुसार, 288 चा मूळ क्रमांक 9 हा होतो. मंगळ हा 9 क्रमांकाचा स्वामी आहे असं म्हटलं जातं. मंगळ हा सर्व ग्रहांचा अधिपती आहे.  धैर्य, उत्साह, शौर्य, युद्ध आणि क्रोध हे मंगळाचे गुणधर्म असतात. त्यामुळे या संख्येवर मंगळाचा प्रभाव आहे असं म्हणता येईल. विशेष म्हणजे हिंदू नववर्षाचा राजा म्हणजेच 'विक्रम संवत 2081'चा राजा मंगळ आहे. तर शनी हा मंत्री आहे.

हे ही वाचा>>  Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार जाहीर; ठाकरेंना काय संदेश?

म्हणजेच या विधानसभा निवडणुकीवर महाराष्ट्रातील गरीब, मागास, दलित आणि दुर्बल घटकातील मतदारांचा मोठा प्रभाव असणार आहे. राजाचा मंत्री म्हणजेच शनी सध्या कुंभ राशीत प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करतोय. 15 नोव्हेंबर 2024 रोजी थेट मार्गक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रात, शनी ग्रह जनहितकारक मानला जातो. म्हणजे आत्तापर्यंत शांत दिसत असलेली जनता विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने मतदान करेल.

मंगळाची स्थिती काहीशी कमकुवत दिसते. कारण, 20 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळाचं संक्रमण कर्क राशीत झालं. निवडणुकीपर्यंत शनी राशीत मंगळाचे संक्रमण होईल. या कारणामुळे मंगळाची स्थिती कमी प्रभाव करणारी असेल. त्यामुळेच यावेळी रणनीतीकारांना योग्य अंदाज वर्तवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. शनिच्या महत्वाच्या भूमिकेमुळे पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यकर्त्यांना अधिक प्राधान्य द्यावं लागणार आहे.

    follow whatsapp