devendra fadnavis Property: देवेंद्र फडणवीसांची संपत्ती आली समोर, किती माहितीए?

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 07:04 PM)

Maharashtra Assembly Election 2024, Devendra Fadnavis Property: राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची नेमकी संपत्ती किती?

देवेंद्र फडणवीस यांची नेमकी संपत्ती किती?

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल

point

देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती किती?

point

अर्ज भरण्यासाठी फडणवीसांसोबत 'या' दिग्गज नेत्यांनी लावली उपस्थिती

Devendra Fadnavis Property: राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. युती-आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्यात सुरुवात केली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करून नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आहे.

हे वाचलं का?

उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांकडे 3.78 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलं होतं. अशातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती घोषित केली आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Weather : दिवाळी आली तरी पावसाचं जायचं नाव नाही! आजही 'या' भागांना मुसळधार इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती अशी की, वर्ष 2023-24 मध्ये फडणवीसांची एकूण संपत्ती 3,873,536 रुपये आहे. वर्ष 2019-20 मध्ये (3019905.00), वर्ष 2020-21 मध्ये (2571651.00), वर्ष 2021-22 मध्ये (3279116.00), वर्ष 2022-23 मध्ये (3861207.00) रुपयांची संपत्ती फडणवीसांच्या नावावर असल्याची माहिती आताच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर करण्यात आली आहे. 

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी फडणवीसांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग फडणवीसांचा अर्ज भरताना उपस्थित होते. तसच पूर्व-नागपूरचे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे भाजपचे उमेदवार मोहन मते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फडणवीसांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक या विभागातून मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. 

    follow whatsapp