Anil Deshmukh Book : '...नाहीतर घरातल्या महिलांनाही चौकशीला बोलवू', देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

मुंबई तक

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 04:00 PM)

अनिल देशमुख यांच्या या पुस्तकात त्यांनी काय खुलासे केलेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांनी केलेल्या पुस्तकाबद्दलच्या ट्वीटमध्ये पुस्तकाचं कव्हर पेज दाखवण्यात आलंय.त्यामाध्यमातून बरेच संकेत देण्यात आले आहेत. तसंच चौकशीदरम्यानचे काही प्रसंगही सांगितले आहेत.

अनिल देशमुख यांचं पुस्तक

अनिल देशमुख यांचं पुस्तक

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनिल देशमुख यांचं पुस्तक

point

ईडी चौकशी दरम्याचे प्रसंग

point

राजकीय वर्तुळात खळबळ माजणार?

Anil Deshmukh Book : हर सुर्खी के पिछे एक गहरी कहाणी छिपी होती है... एखाद्या चित्रपटाच्या सुरूवात व्हावी अशी ही ओळ लिहित माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी एक ट्वीट केलंय. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आगामी पुस्तकाची माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा कार्यकारळ वादातीत ठरला होता. तसंच त्यानंतरही ते मोठा काळा तुरुंगात राहिले होते. एकूणच या सर्व इतिहासामुळे ते या पुस्तकात नेमकं काय लिहिणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांनी केलेल्या पुस्तकाबद्दलच्या ट्वीटमध्ये पुस्तकाचं कव्हर पेज दाखवण्यात आलंय.त्यामाध्यमातून बरेच संकेत देण्यात आले आहेत. तसंच चौकशीदरम्यानचे काही प्रसंगही सांगितले आहेत. (Anil Deshmukh Book The Diary of Home Minister to stir Maharashtra Politics)

हे वाचलं का?

"डायरी ऑफ ए होम मिनिस्ट : सत्ता, साजिश और सच्चाई : एक गृहमंत्री की संघर्षगाथा" या नावाने लवकरच अनिल देशमुख यांचं पुस्तक येणार आहे. यामाध्यमातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा ते करणार असल्याचं दिसतंय. या पुस्तकाच्या कव्हर पेजवर याबद्दलची माहिती मिळते. या पुस्तकात अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आपल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता असाही उल्लेख केल्याचं म्हटलं जातंय.

पुस्तकाच्या पृष्ठावर काय लिहिलंय?

 

हे ही वाचा >>Salman Khan Case : लॉरेन्सच्या नावाने सलमानला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, भाजीवाला म्हणाला मी...

"डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ही एक रोमांचक आत्मकथा आहे. या पुस्तकात ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आपल्या जीवनातील सर्वात आव्हानात्मक काळाबद्दलचे खुलासे केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याच्या कोविड काळातील प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता, तिथून या सर्व संघर्षमय काळाची सुरूवात झाली होती. यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, मात्र भ्रष्ट पोलीस, विरोधी पक्ष आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्याविरोधात षडयंत्र तयार करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये झालेले बदल या पुस्तकात मांडलेले आहेत. तसंच एका नेत्याने अन्यायाविरोधात लढून आपली प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षही मांडण्यात आलाय . महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून सक्रीय असलेल्या अनिल देशमुख यांनी जेलमध्ये असताना लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तिचं प्रतिकही आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक त्या प्रत्येक माणसासाठी प्रेरणा आहे, जे सत्तेमागे असलेल्या अंधारावर प्रकाश टाकू पाहतायत." 

अनिल देशमुख यांच्या पुस्तकातला एक प्रसंग


"चौकशीच्या सुरूवातीलाच हडबडलेल्या ईडीच्या अधिकाऱ्याने मला विचारले की, तुमचं वर काही बोलणं झालंय का? 

कशाबद्दल? मी अगदी सहज विचारलं, तर तो ईडीचा अधिकारी काहीतरी गूढ असल्यासारखा गालातल्या गालात हसला. त्यांच्या त्या हसण्याचा अर्थ कळायला मला वेळ लागला नाही. ईडीचे राजकीय सुत्र धार असलेल्या केंद्रातील भाजप सरकारबद्दलचा तो प्रश्न होता.

"नाही माझं काहीच बोलणं झालेलं नाही..." मी उत्तर दिलं. 

मात्र माझ्या या उत्तराने त्यांच्या चेहऱ्यावर कोड्यात पडल्याचे भाव उमटले. "नाही?" असं विचारत तो पुढे म्हणाला -"तुम्ही वरती बोलून घ्यायला हवं होतं..."

असं बोलून थोड्यावेळासाठी तो बाहेर गेला. नंतर पुन्हा आत येऊन त्याने मला विचारलं. "तुम्ही चौकशीसाठी आजचाच दिवस का निवडला? आमची सगळ्यांचीच दिवाळी खराब करुन टाकलीत."  

त्या दिवशी माझ्यामुळे ईडीच्या कित्येक अधिकाऱ्यांना सुट्टीवर असतानाही पुन्हा कार्यालयात बोलावण्यात आलं. काही जणांना तर दुसऱ्या राज्यातून विमानाने बोलावून घेण्यात आलं."
 
यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्याला पुढे विचारण्यात आलेल्या प्रश्नोत्तराबद्दल आणि धमकी वजा इशाऱ्यांबद्दलही लिहिलं आहे.

 "ईडीचे अधिकारी माझा जवाब नोंदवून घेत नव्हते. चौकशीदरम्यान आपण त्यांना थेट सांगून टाकल की, अॅन्टिलिया विस्फोटक कांड प्रकरण आणि त्या प्रकरणाचा एकमेव साक्षीदार असलेल्या मनसुख हिरेनचं हत्याकांड प्रकरण, या दोन्ही प्रकरणांचा खरा सूत्रधार एकच आहे, मुंबईचा माजी पोलीस आयुक्त आणि फरार असलेला परमबीर सिंह!" 

तेव्हा ईडीचे अधिकारी आपला हा जबाब नोंदवून घ्यायला तयार नव्हते असा आरोप अनिल देशमुखांनी केला. यावेळी अधिकारी आणि माझ्यात खडाजंगी झाली. त्यानंतर काही वेळाने येऊन ईडीचा अधिकारी आपल्याला म्हणालेत की, "तुम्ही जर वरील जबाब नोंदवण्यासाठीच आग्रही असाल तर, आम्हाला तुमच्या घरातील महिलांनाही चौकशीसाठी बोलवावं लागेल."

 

हे ही वाचा >>Amol Mitkari Akola : राष्ट्रवादीचं काही अस्तित्व आहे की नाही... उमेदवारीसाठी आक्रमक, मिटकरी इरेला पेटले

 

दरम्यान, अनिल देशमुख यांनी आतापर्यंत अनेकदा आपल्याला फसवण्यात आल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी त्यांनी भाजप नेत्यांवर आणि काही पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता अनिल देशमुख या पुस्तकातून कोणते मोठे खुलासे करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


 

    follow whatsapp