Opinion Poll: माझी लाडकी बहीण योजना विधानसभेला जादू करणार? शिंदे सरकारसाठी मोठी बातमी

मुंबई तक

09 Sep 2024 (अपडेटेड: 09 Sep 2024, 09:41 PM)

Opinion Poll and Mazi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचा आगामी निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार याबाबत ओपिनियन पोलमधून नवी माहिती समोर आली आहे.

शिंदे सरकारसाठी मोठी बातमी

शिंदे सरकारसाठी मोठी बातमी

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजना ठरणार महत्त्वाची

point

विधानसभा निवडणुकीत या योजनेचा किती फरक पडणार?

point

ओपिनियन पोलमधून समोर आली नवी माहिती

Times Now Navbharat-Matrize Opinion Poll Maharashtra: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी, आता हळूहळू त्याचे पडघम वाजू लागेल आहेत. महाराष्ट्रात  नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार हे जवळजवळ निश्चित आहे, कारण सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत ही नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट) यांच्यात आहे. (opinion poll mazi ladki bahin yojana will be a game changer big news for shinde government)

हे वाचलं का?

दरम्यान, टाइम्स नाऊ नवभारत-मॅट्रिक्सने निवडणुकीआधी एक ओपिनियन पोल केला आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात बरीच चुरशीची स्पर्धा असेल अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, या सर्व्हेमध्ये प्रामुख्याने माझी लाडकी बहीण योजनेचा नेमका किती फायदा होणार याविषयी महाराष्ट्रातील मतदारांना विचारण्यात आलं. पाहा त्यावर लोकांचं नेमकं मत काय आहे.

हे ही वाचा>> Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

पाहा सर्व्हेत नेमकं काय म्हटलंय.. 

1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा?

मुख्यमंत्री पदाचा उमेदवार: 29%
युती: 23%
सरकारी कामकाज: 11%
शेतकऱ्यांशी संबंधित समस्या: 5%
रोजगार: 9%
इतर: 23%

2. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) यांच्याशी केलेल्या युतीमुळे भाजप आणि आरएसएसमधील मतभेद याचा परिणाम दिसून येईल का?

कोणताही परिणाम होणार नाही: 36%
लक्षणीय परिणाम होईल: 39%
काही प्रमाणात प्रभावित होईल: 22%
सांगता येणार नाही: 3%

3. अजित पवार हे शरद पवारांसोबत पुन्हा जाऊ शकतात का?

होय: 45%
संख्या: 33%
सांगता येत नाही: 22%

4. निवडणुकीपूर्वी महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा जाहीर झाला तर?

सकारात्मक परिणाम होईल: 43%
नुकसान सहन करावे लागू शकते: 30%
कोणताही महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार नाही: 18%
सांगता येत नाही: 9%

5. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीबाबत तुमचे काय मत आहे?

खूप चांगले: 39%
सरासरी: 23%
अजिबात चांगले नाही: 21%
सांगता येत नाही: 17%

हे ही वाचा>> Amit Shah : महायुतीचा विधानसभेचा मेगाप्लान ठरला? शहांसोबतच्या बैठकीची Inside Story

6. लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत किती परिणाम होईल?

खूप प्रभावी: 58%
काही प्रमाणात प्रभावी सिद्ध होईल: 24%
कोणताही फायदा होणार नाही: 6%
माहित नाही/सांगता येणार नाही: 5%
प्रचार करण्याचा एक मार्ग: 7%

7. निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ योजनेच्या घोषणेचा काय परिणाम होईल?

गेमचेंजर: 36%
काही प्रमाणात प्रभावी: 33%
कोणताही प्रभाव नाही: 22%
सांगता येत नाही: 9%

8. मुख्यमंत्री पदासाठी तुमची कोणाला पसंती?

एकनाथ शिंदे : 37%
उद्धव ठाकरे : 21%
देवेंद्र फडणवीस : 21%
शरद पवार : 10%
इतर: 11%

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? 

पक्ष मतदानाची टक्केवारी जागा 
भाजप     26.2 टक्के   83-93
शिवसेना (एकनाथ शिंदे)   6.8 टक्के   42-52
राष्ट्रवादी (अजित पवार)  2.8 टक्के  07-12
काँग्रेस   16.2 टक्के 58-68
शिवसेना (UBT)   14.2 टक्के  26-31
राष्ट्रवादी (शरद पवार)  13.7 टक्के 35-45
इतर 10.1 टक्के 03-08

 

    follow whatsapp