Majhi Ladki Bahin Yojana: महायुतीमध्ये असलेले अपक्ष आमदार रवि राणा यांनी केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. रवि राणा यांनी सरकारला आशीर्वाद (मते) दिली नाही, तर १५०० रुपये खात्यातून परत घेईन, असे विधान केले. 'लाडक्या बहिणींना गुलाम बनवण्याची ही योजना आहे', अशी टीका संजय राऊत यांनी या विधानावर केली आहे. काँग्रेस, शिवसेना (युबीटी) या पक्षांनी या विधानावर टीका केली आहे. (A controversy has arisen over Ravi Rana's statement about Majhi ladki bahin yojana)
ADVERTISEMENT
महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. महायुतीकडून प्रचारात याच योजनेभर भर दिला जात आहे. या योजनेबद्दल बोलताना महायुतीसोबत असलेले अपक्ष आमदार रवि राणा यांनी एक विधान केले.
रवि राणा 1500 रुपयांबद्दल काय म्हणाले?
"१५०० रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की, १५०० रुपयांचे ३००० रुपये झाले पाहिजे. हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ आहे, ते १५०० रुपये खात्यातून वापस घेऊन येईल", असे रवि राणा म्हणाले.
हेही वाचा >> "एकाच गोष्टीमुळे मी लोकसभेला तरले"
"आम्ही पैसे देतो, तुम्ही आमच्या गुलाम व्हा"
रवि राणा यांच्या विधानाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "त्यांची मानसिकता आहे. आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम व्हा. ही लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे. जर ही यांची भाषा असेल, तर लाडक्या बहिणींचा अपमान, महिलांचा अपमान... आम्ही तुम्हाला १५०० रुपये देतो. तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे."
रवि राणांकडून सारवासारव
या विधानावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली. वाद निर्माण झाल्यानंतर रवि राणा यांनी खुलासा केला.
हेही वाचा >> पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल: फडणवीस
"मी गंमतीने ते विधान केले होते. त्यानंतर अनेक महिला हसत होत्या. बहीण भावाचे नाते हे गंमतीचे असले पाहिजे. मात्र, विरोधक माझ्या विधानाचा बाऊ करत आहेत. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे", असे रवि राणा यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT