Ravindra Waikar : "कीर्तिकर EVM मध्ये 1 मताने जिंकले होते, नंतर...", वायकरांनी सोडलं मौन

भागवत हिरेकर

16 Jun 2024 (अपडेटेड: 16 Jun 2024, 04:37 PM)

Ravindra Waikar Mumbai North west Lok sabha : विरोधकांकडून आरोप केल्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल वादात सापडला आहे. त्यावर आता वायकर यांनीही उत्तर दिले आहे.

अमोल कीर्तिकर यांचा रवींद्र वायकर यांनी ४८ मतांनी पराभव केला. या निकालावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल वाद

point

रवींद्र वायकर यांची विरोधकांच्या आरोपावर प्रतिक्रिया

point

ईव्हीएम मशीन मतमोजणीवर शंका

Ravindra Waikar Mumbai North west Lok sabha : (देव कोटक, मुंबई) अत्यंत अटीतटीच्या लढतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर हे ४८ मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. पण, मतमोजणीबद्दल अमोल कीर्तिकर यांनी शंका उपस्थित करत तक्रार केली. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांच्यासह निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे देशभरात या प्रकरणाची चर्चा असून, आता वायकर यांनी मौन सोडत विरोधकांना उत्तर दिलं. (Doubts are being raised on the results of the Mumbai North West Lok Sabha elections 2024. It has been answered by Ravindra Waikar)

हे वाचलं का?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबद्दल रवींद्र वायकर यांनी भूमिका मांडली. त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

रवींद्र वायकर यांनी आरोपांना काय दिले उत्तर?

माध्यमांशी बोलताना वायकर म्हणाले, "हा सर्व रडीचा डाव चाललेला आहे. बाकी काही नाहीये. हा दूध का दूध पाणी का पाणी होईल. कुणी ट्विट केलंय. देशभरात लोकसभा निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर सगळीकडेच निकाल आले. त्या निकालांप्रमाणेच माझाही निकाल आला. मी पाऊणे सहापर्यंत इथे होतो. मी सहा वाजता तिथे गेलो."

हेही वाचा >> ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर 

"सहा वाजता गेल्यानंतर अगोदरच त्या उमेदवारा विजयी घोषित करून टाकलं होतं. पाच वाजताच घोषित करून टाकलं होतं. एक लाख मते मोजण्याची शिल्लक असताना... म्हणून मी तिथे गेलो. नाहीतर गेलोही नसतो. तिथे गेल्यानंतर बघितलं तर सिस्टिमने कामं चालली होती. त्यामुळे मी काही बोलण्याचा प्रश्न नाही. तिथे गेल्यानंतर मी म्हटलं की आमची अजून मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे मी तिथे जाऊन बसलो", असे त्यांनी सांगितले.  

ईव्हीएम मतमोजणीत अमोल कीर्तिकर एका मताने जिंकले होते - रवींद्र वायकर

"मी तिथे जाऊन बसल्यावर एकदीड तासांनी निकालाची घोषणा करण्यात आली. बॅलेट पेपरची मतमोजणी सकाळी आठ वाजता झालेली आहे. त्यामध्ये 1501 मते त्यांना मिळाली आणि 1550 मते मला मिळाली. ईव्हीएममध्ये ते (अमोल कीर्तिकर) एका मताने जिंकलेले होते. त्यातून 1550 वजा झाले आणि मी 48 मतांनी जिंकून आलो", असे सांगत वायकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा >> कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या

"तिथे हजारो पोलीस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी, 20 उमदेवार आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो? हे कसं काय कळत नाहीये मला. हे काय चाललंय, रडीचा डाव चाललेला आहे. त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे. जिव्हारी लागल्या कारणाने हे ट्विट आणि सगळं चाललेलं आहे. त्यामुळे या रडीच्या डावाला मी काही महत्त्व देत नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने निवडणूक घेतलेली आहे", असे उत्तर वायकर यांनी दिले.  

ईव्हीएम हॅक होऊ शकते का? वायकर यांचा उलट सवाल

"दुसरा प्रश्न मोबाईलचा... तिथे किती जणांकडे मोबाईल होते? मग कायद्याप्रमाणे जो काही दंड असेल, मग तो ५०० रुपयांचा दंड असेल... तो बसेल ना. कुणी कुणाचा नातेवाईक आहे म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केले... असं काही ईव्हीएम मशीन हॅक करता येते का? रडीचा डाव चाललेला आहे. त्यामुळे त्याला मला काही उत्तर द्यावे वाटतं नाही", अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी विरोधकांच्या आरोपावर मांडली.

    follow whatsapp