NCP : 'लोकसभा झाल्यानंतर भाजपला...', रोहित पवारांचं कर्जतमध्ये घणाघाती भाषण

मुंबई तक

07 Feb 2024 (अपडेटेड: 07 Feb 2024, 02:06 PM)

भाजपकडून राज्यातील कुटुंब आणि पक्ष फोडले जातायत, यामागचे कारण म्हणजे, त्यांचा कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर विश्वास राहिला नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

ी. कदाचित लोकसभा झाल्यानंतर तर त्यांना त्यांच्या चिन्हावर लढावं लागणार नाही, भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे.

rohit pawar criticize bjp devendra fadnavis ncp political crisis ahmednagar news sharad pawar vs Ajit pawar

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप सोयीनुसार संविधान बदलेल

point

भाजपकडून कुटुंब आणि पक्ष फोडले जातायत

point

त्या नेत्यांच राजकीय अस्तित्व भाजपने संपवले

point

पंकजा मुंडेंची काय परिस्थिती आहे

Rohit Pawar Criticize Bjp : रोहित वाळके, अहमदनगर :  केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा मोठा निर्णय दिला. या निर्णयानंतर अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालं आहे. या  निर्णयानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)पडणार नाही. कदाचित लोकसभा झाल्यानंतर तर त्यांना त्यांच्या चिन्हावर लढावं लागणार नाही, भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. ( rohit pawar criticize bjp devendra fadnavis ncp political crisis ahmednagar news sharad pawar vs Ajit pawar) 

हे वाचलं का?

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील एका कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते. यावेळी बोलताना रोहित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केले. 2024 मध्ये जर भाजपची सत्ता आली तर, मला असे वाटते भाजप नेते स्वत:च्या सोयीनुसार संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील. लोकशाही राहिल की नाही हा देखील प्रश्न आहे. भाजपकडून राज्यातील कुटुंब आणि पक्ष फोडले जातायत, यामागचे कारण म्हणजे, त्यांचा कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर विश्वास राहिला नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच पक्ष फोडायचे आणि मग गणिताचा खेळ सुरू, याचा थोडा आकडा घ्यायचा आणि त्याचा थोडा आकडा घ्यायचा आणि आपले पुढे न्यायचं,असे भाजपचे राजकारण असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. 

दरम्यान आतापर्यंत जे लोकनेते भाजपसोबत गेले आहेत, त्यांच राजकीय अस्तित्व भाजपने संपवले आहे. एकनाथ खडसे, फुंडकर, थोरल्या मुंडे साहेबांचे तेच झाले आहे. पंकजा मुंडेंची काय परिस्थिती आहे. त्यांच्याकडे जनमत आहे, पण मुद्दामुन् भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यप्रदेशमध्ये सिंधिया कुटुंब, राजस्थानमध्ये सुद्धा तेच झालं, आणि महाराष्ट्रात जे लोक गेले आहेत, त्यांचं अस्तित्व संपवण्यात आले, असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत. 

    follow whatsapp