Satish Wagh Murder Case: भाजप आमदाराच्या मामाचा मामीनेच घेतला जीव, मुलाच्याच मित्रासोबत होते अनैतिक संबंध

Satish Wagh Murder Case Updates: मोहिनी वाघ यांनी आपल्या मुलाच्या मित्रासोबतच अनैतिक संबंध ठेवले होते. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Dec 2024 (अपडेटेड: 26 Dec 2024, 07:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे

point

मुलाच्या मित्राशीच होते मोनिका वाघ यांचे अनैतिक संबंध

point

आमदार योगेेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला झाली होती हत्या

Satish Wagh Case Story : पुण्यामध्ये काही दिवसांपूर्पी भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्येचं प्रकरण गाजलं होतं. हॉटेल व्यावसायिक सतिश वाघ यांच्या हत्येनं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, यामध्ये आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे. योगेश टिळेकर यांच्या मामी म्हणजे मृत सतिश वाघ यांच्या पत्नीनेच सतीश वाघ यांची सुपारी देऊन त्यांना संपवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार असल्याचंही म्हटलं जातं आहे. गेल्या 9 डिसेंबरला योगेश टिळेकर यांचं अपहरण करुन हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आता खळबळजनक खुलासे झाले आहेत. 

हे वाचलं का?

सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे अक्षय जवळकर नावाच्या एका तरूणाशी अनैतिक संबंध होते. ज्यामध्ये पती सतीश वाघ हे अडसर ठरत होते. त्यामुळेच 5 लाख रुपयांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवण्याचा कट मोहिनी वाघ हिने रचला असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ याच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा >>   Pune Crime News : पुण्यात दोन चिमुकल्या बहिणींचा खून, पाण्याच्या टाकीत सापडले मृतदेह, नागरिकांचा संताप

मोहिनी वाघ यांनी आपल्या मुलाच्या मित्रासोबतच अनैतिक संबंध ठेवले होते. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. या काळातच मोहिनी वाघ यांचे आणि अक्षयचे सूत जुळले. पुढे या संबंधांचं प्रेमात रुपांतर झालं आणि इथूनच सुरू झाले मोहिनी आणि अक्षय यांचे अनैतिक संबंध. या सर्व गोष्टींमध्ये सतीश वाघ हे अडसर ठरत होते, त्यामुळे मोहिनी वाघ यांनीच पाच लाख रुपये अक्षयला दिले आणि खून करण्याचं ठरवलं. 

हे ही वाचा >> Sambhajinagar Clerk Scam : कंत्राटी कर्मचाऱ्यानं संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा कसा केला? नेमका काय झोल केला?

अक्षयने याप्रकरणाची सुपारी पवन आणि त्याचे साथीदार नवनाथ आणि विकास यांना दिली. अक्षय जवळकरने काही पैसे आरोपींना दिले तर काही पैसे बाकी होते अशी माहिती आहे.  

    follow whatsapp