‘फुलावरुन नाव पण काट्यासारखे वागतात’, आदित्य ठाकरेंकडून गुलाबरावांना टोचणारी टीका

रोहित गोळे

• 01:19 PM • 25 Jul 2023

शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते विधानसभेत हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray has criticized Shiv Sena minister Gulabrao Patil. They are acting in a dictatorial manner in the assembly. Aditya Thackeray has made this allegation.

Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray has criticized Shiv Sena minister Gulabrao Patil. They are acting in a dictatorial manner in the assembly. Aditya Thackeray has made this allegation.

follow google news

Political News Maharashtra: मुंबई: शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर आज (25 जुलै) तुफान टीका केली आहे. सुरुवातीला आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेल्या दालनाविषयी जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचेच मंत्री गुलाबराव पाटील यांना अत्यंत बोचणाऱ्या शब्दात खडे बोल सुनावलं आहे. एका मंत्र्याचं नाव फुलावरुन आहे. पण ते वागतात काट्यासारखे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सुरुवातीला मुंबई महापालिका, मणिपूर या मुद्द्यांवरुन भाजपवर टीका केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत ज्या पद्धतीने मंत्री उत्तर देत आहेत त्यावरून आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली.

पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले:

‘काल जर आपण पाहिलं असेल आणि परवा देखील पाहिलं असेल तर हुकूमशाहीची पद्धत, ही हुकूमशाहीची जी सवय आहे.. एक मंत्री महोदय ज्यांचं फुलावरून नाव तरी देखील काट्यासारखे वागत आहेत. आपण परवा पाहिलं असेल की, प्रणितीताई ज्या काँग्रेसच्या आमदार आहेत त्या प्रश्न विचारत असताना हे मंत्री महोदय भडकले.. की तुम्ही वेगळाच प्रश्न विचारत आहात. असं तसं.. अमूक-तमूक.. खरं तर त्यांचं हे कर्तव्य आहे की, त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं.’

हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह Video, आव्हाडांच्या मुलीचं ‘ते’ ट्वीट प्रचंड चर्चेत

‘पण मंत्री महोदयांचा अभ्यास कच्चा होता. म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. काल भाजपच्याच आमदार देवयांनी फरांदे ताई या देखील प्रश्न विचारत असताना का भडकले हे मंत्री महोदय?’

‘काय तर म्हणे.. किती प्रश्न विचारता, 70 मिनिटं प्रश्न विचारता.. त्यांचं कर्तव्य आहे की, ते प्रश्न विचारणं, आमदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की, प्रश्न विचारणं. मंत्र्यांचं कर्तव्य आहे की, त्यांनी उत्तरं देणं. पण उत्तरं येत नसतील अभ्यास कच्चा असेल म्हणून दादागिरी करायची का सभागृहात?’

हे ही वाचा >> Kirit Somaiya : ‘नवीन पॉर्नस्टार गिरगीट सोमय्या’, व्हिडीओनंतर कल्याणमध्ये…

‘कदाचित या दोघी महिला सदस्या असतील म्हणून असं त्यांना उत्तर किंवा प्रश्न विचारू नये असा प्रयत्न असेल. पण हे सगळं आता चालणार नाही. जनता बघत आहे आणि जनता यांना योग्य वेळी उत्तर देईल.’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका तर केलीच मात्र, त्याचवेळी भाजपवर देखील ताशेरे ओढले.

    follow whatsapp