Supriya Sule On Ajit Pawar : पुण्यात उप मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली पुणे जिल्हा नियोजनाची बैठक वादळी ठरली होती. या बैठकीला खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) हजेरी लावली होती. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारले होते. या दोन्ही खासदाराच्या प्रश्नावरून अजित पवारांनी थेट जीआर काढून नियम दाखवला होता. या बैठकीतल्या घडामोडींवर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) चांगल्याच कडाडल्या आहेत. (supriya sule criticize ajit pawar on dpdc meeting pune ajit dada gr)
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पिंपरी चिचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या बैठकीतला संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. यावेळी सुप्रिया म्हणाल्या, ''आज डीपीडिसी बैठक झाली. आज मी वडिलांकडून आणखी एक गोष्ट शिकले. जेंव्हा पालकमंत्री (अजित पवार ) आले तेंव्हा पवार साहेबांसह सगळे उभे राहिले. जी व्यक्ती पालकमंत्री होती, त्या पदाचा तो मान होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे हे विचार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हे ही वाचा : Pune News : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता व्यक्तीचा फोटो, कुटुंबियांना बसला हादरा
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ''याच बैठकीत मी आणि अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी पालकमंत्री यांनी एक कागद काढला आणि त्यांनी खासदार-आमदारांबाबत मुद्दा मांडला. या बैठकीत फक्त आमंत्रित केलेलं आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मात्र माझ्याकडे एक जीआर आहे, त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आम्हाला मत देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही निधीबाबत प्रश्न उपस्थित केलं.
मात्र, या सशक्त लोकशाहीत आमचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे. या हुकूमशाही विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे,'', असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केलाय.
माझं म्हणणं त्यांनी पुर्णपणे ऐकलं नाही. मावळला दिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत. त्यामुळे जो न्याय तुम्ही मावळला देता, तोच न्याय तुम्ही बारामती आणि शिरूरला दिला पाहिजे. ही अपेक्षा होती, पण ते नाराज झाले. ते म्हणाले बारामतीला खूप दिलं तेव्हा आम्ही कुठे काय बोललो? त्याच्यावर फारस मी बोलावं असं मला वाटतं नाही. त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांना करावा, असे सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT