Supriya Sule : शिखर बँक घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना पकडलं कोंडीत

मुंबई तक

• 06:11 PM • 14 Jul 2024

Supriya Sule On Shikhar Bank Scam : देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर जे आरोप केले, त्यात क्लीनचीटही देवेंद्रजीच करतात.त्यामुळे देवेंद्रजीच्या शब्दासाठी या सगळ्या गोष्टी घडतायत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

supriya sule reaction on shikhar bank scam ajit pawar clean chit challenge  devendra fadnavis

देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागितली पाहिजे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्रजीच्या शब्दासाठी या सगळ्या गोष्टी घडतायत

point

देवेंद्रजींनी दाखवलेली कागदपत्र खोटी होती का मग?

point

शिखर बँक घोटाळ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule On Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिखर बँक घोटाळ्यावरून देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.(supriya sule reaction on shikhar bank scam ajit pawar clean chit challenge  devendrA fadnavis)  

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या. यावेळी त्यांना शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी  काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर जे आरोप केले, त्यात क्लीनचीटही देवेंद्रजीच करतात.त्यामुळे देवेंद्रजीच्या शब्दासाठी या सगळ्या गोष्टी घडतायत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ

मग देवेंद्रजींनी जी कागदपत्र दाखवली ती खोटी होती का मग? आणि जर या गोष्टी खोट्या असतील तर देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागितली पाहिजे. हो आम्ही जे तुमच्यावर आरोप केले होते ते खोटे होते, असे विधान करत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

संजय राऊत काय म्हणाले? 

 शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी क्लीनचिट मिळणे हाच एक मोठा घोटाळा आहे. हजारो कोटींचे आरोप करायचे लाखो रुपये खर्च करायचे. आरोपी सरकारमध्ये आला की घोटाळा बंद करायचा मात्र झालेला खर्च फडणवीसांकडून घेणार की मोदी आणि शहांच्या पगारातून कापणार? असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana कधीपर्यंत सुरू राहणार? अजित पवारांनी बारामतीत सांगून टाकलं

अजित पवारांच्या अडचणी वाढणार 

 शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट देण्यात आली होती. या क्लीनचिटला आता नव्याने आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp