Shiv Sena : एकनाथ शिदेंची माजी मंत्र्याने सोडली साथ, शिवसेनेला केला जय महाराष्ट्र!

मुंबई तक

• 09:59 AM • 26 Apr 2024

Eknath Shinde Suresh Navale : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी राजीनामा दिला.

सुरेश नवले यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश नवले यांनी दिला शिवसेनेचा राजीनामा

point

एकनाथ शिंदेंवर भाजपचा दबाव असल्याचा दावा

point

शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप

Eknath Shinde Suresh Navale : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीमुळे प्रचार आणि बैठकात गुंतलेले असतानाच माजी मंत्र्यांने शिवसेनेचा राजीनामा दिला. प्रभू रामचंद्राला साकडे घातलो की, मित्र पक्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संरक्षण करो, असे म्हणत माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. (Suresh Navale quits to eknath Shinde's Shiv Sena)

हे वाचलं का?

महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाचा पेच निर्माण झाला. शिवसेनेच्या काही विद्ममान खासदारांची तिकिटे कापण्यात आली. भाजपने सर्व्हे दाखवून तिकिटे कापल्याचा आरोप सुरेश नवले यांनी केला होता. नवले सातत्याने भाजपवर टीका करत होते. अखेर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. 

नवलेंनी का दिला शिवसेनेचा राजीनामा

सुरेश नवले म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आलेत, त्यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी गेला. कदाचित हेमंत गोडसे यांचाही बळी जाण्याची शक्यता आहे", अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> गीतेंचं भाषण सुरू असताना जाधवांनी माईक हातात घेतला... म्हणाले ''मी गद्दारी केली नाही'' 

नवलेंनी पुढे म्हटले की, "जे शिवसैनिक तुमच्यासोबत आले, ते मित्रपक्षाच्या दबावामुळे आलेत, त्यांना तुम्ही न्याय देत नाहीत, असा चुकीचा संदेश महाराष्ट्रात जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजपवाले सत्तेची फळं चाखत आहे."

हेही वाचा >> राज ठाकरेंनी कमी केलं शिंदेंचं टेन्शन, काय घडलं?

"एकनाथ शिंदेंनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपला बसता आले . नाहीतर भाजपला रस्त्यावर मोर्चे काढावे लागले असते. उपोषण करावे लागले असते. ज्यांनी आपले स्वतःचे आयुष्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मुख्य नेता म्हणून त्यांची निवड केली. त्यांना साधी लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही, ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका आहे. पक्ष चालवत असताना मित्र पक्षाच्या दबावाला बळी पडू नये", असे नवले शिंदेंना उद्देशून म्हणाले आहेत.

शिंदेंचं रामचंद्र संरक्षण करो -नवले

"पक्षाच्या शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे. जर त्यांना न्याय मिळत नसेल, तर त्यांनी कोणाकडे पाहायचे, हा प्रश्न निर्माण होतो. प्रभू रामचंद्राला साकडे घातलो की, मित्रपक्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संरक्षण करो", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp