Video : ''कमळाला मत देण्यासाठी 'लाडकी बहीण'चा जूगाड'', BJP आमदार 'हे' काय बोलून गेला?

योगेश पांडे

• 10:00 PM • 24 Sep 2024

Tekchand Sawarkar Video : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात तुफान चर्चा आहे. हीच योजना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशात कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी मोठं विधान केले आहे. माझी लाडकी बहीण कमळाला मतं देईल, म्हणून योजनेचा जुगाड केल्याचे विधान टेकचंद सावरकर यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

tekchand sawarkar bjp mla big statement on mukhymantri ladki bahin yojana vijay waddetiwar share video and criticize

BJP आमदार 'हे' काय बोलून गेला?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मताची पेटी आली की लाडकी बहीण कमळाला वोट देईल

point

महिलांच्या मतांसाठी ही भानगड सूरू आहे

point

भाजप आमदाराच्या विधानाने भाजपा अडचणीत

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana, Tekchand Sawarkar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात तुफान चर्चा आहे. हीच योजना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशात कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) यांनी मोठं विधान केले आहे. माझी लाडकी बहीण कमळाला मतं देईल, म्हणून योजनेचा जुगाड केल्याचे विधान टेकचंद सावरकर यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Waddetiwar) यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे आमदाराच्या विधानामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (tekchand sawarkar bjp mla big statement on mukhymantri ladki bahin yojana vijay waddetiwar share video and criticize) 

हे वाचलं का?

विजय वड्डेटीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भाजप आमदार टेकचंद सावरकर हिंदीत भाषण करताना दिसत आहेत. ''अभी हम इतना बडा भानगड काय के लिए किया वह बताओ जरा. इमानदारी से बताओ. अंत:करण से. जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएँगी, तो मेरी ये लाडली बहना, कमल को वोट देंगी, इसके लिए तो हमने यह जुगाड किया. यह सब सहीं बोलते हैं. सब झूट बोलते रहेंगे, मैं सही बोल रहा हुँ. नहीं तो बताने का यह और करने का वोह, हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता हैं?', असं भाजप आमदार टेकचंद सावरकर या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरला नागपूरमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सावरकर यांनी हे विधान केले आहे. 

हे ही वाचा : Akshay Shinde Encounter :एन्काऊंटर की हत्या? आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? खासदार नरेश म्हस्के म्हणाले..

या व्हिडिओवरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारला घेरायला सुरूवात केली आहे. अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी महायुतीवर केली आहे. 

'त्या' व्हिडिओवर सावरकर काय म्हणाले?

''मी हिंदीत भाषण देत होतो. भाषणाचा विपर्यास केला आहे. महिलांना एकत्र आणलं आहे. शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी जुगाड केला आहे. मतदानासाठी ही योजना आहे, असा अर्थ होत नाही. सुनील केदार यांनी ही योजना बंद करण्याचे वक्तव्य केलं आहे. काँग्रेस जवळ काहीच नाही म्हणून एडिट करून व्हिडीओ व्हायरल करत आहोत. मी मेळावे घेतले आहेत'', असा खुलासा टेकचंद सावरकर यांनी केला.

''सरकारवर याचा कुठलाही परिणाम होत नाही. विरोधकांचे कामच आहे, व्हिडीओ व्हायरल करणे, ही योजना जुमला आहे, असं विरोधक म्हणायचे. सरकारी योजना लोकांना लाभ देण्यासाठी असतात, याचा येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो'', असा दावा टेकचंद सावरकर यांनी केला.

    follow whatsapp