Uddhav Thackeray on Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचार दौऱ्यांवरून घेरलं. तिकडे विश्वगुरू (नरेंद्र मोदी) आलेले असताना हे (एकनाथ शिंदे) जाऊन काय दिवे लावणार आहेत?, असा सवाल करत ठाकरेंनी शिंदेंबरोबरच भाजपलाही सुनावलं.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती आणि सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोट ठेवलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्लीवाऱ्या करताहेत. जरा यांच्यावर काही बोललं की हे गद्दार गळा काढताहेत की गरीब शेतकऱ्याचा मुलगा… शेतीबद्दल आदर आहे, पण गरीब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती, ज्या शेतीमध्ये हे हेलिकॉप्टरने जातात. मी तर म्हणतो अशी शेती, असं वैभव माझ्या साध्या आणि छोट्या शेतकऱ्यांनाही लाभो अशी मी प्रार्थना करतो”, असं ठाकरे म्हणाले.
तिकडे जाऊन गळा काढतात
“कुणाचंही शेत असं पंचतारांकित नसेल. शेतकरी बिचारा पायवाट तुडवत जातो. तो रात्री पाणी द्यायला जातो. त्याला सर्पदंश होतो, विंचू चावतो, असं या पंचतारांकित शेतीत होतं नाही. पण, तिकडे जाऊन गळा काढतात”, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
Marathi News LIVE Updates : “दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे, राज्याला…”; ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात
पाच राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने केलेल्या घोषणांवर ठाकरेंनी बोट ठेवलं. “हे जे रेवडीवाले आहेत, भाजपवाले. इतर राज्यांत निवडणुका असताना रेवडी उडवत आहेत. तुम्ही तिकडे रेवड्या उडवता आहात, मग महाराष्ट्राने काय पाप केलं आहे. महाराष्ट्रात निवडणुका आल्यानंतर तुमच्या तिजोरीची दारं उघडल्यासारखी दाखवणार, पण तोपर्यंत महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला.
“शासन आपल्या दारी, अरे पण…”
उद्धव ठाकरेंनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतःचं घरं सोडून दुसऱ्याच्या दारी फिरताहेत… शासन आपल्या दारी… अरे पण कुणाच्या दारी जाताहेत तुम्ही? तिकडे दुसऱ्या राज्यात जाता आहात. त्या राज्याला काय मुख्यमंत्री नाही का? स्वतः पंतप्रधान… तिकडे विश्वगुरू आल्यानंतर हे (एकनाथ शिंदे) तिकडे जाऊन आणखी काय दिवे लावणार आहेत. तुम्ही स्वतः घर का सांभाळत नाही”, असा सवाल करत ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं.
हेही वाचा >> राज ठाकरे CM शिंदेंवर भडकले; म्हणाले, “नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार,पण…”
“आज जे असंवैधानिक मुख्यमंत्री आहेत, ते स्वतःचं घर सोडून इतरांची घरं धुंडाळताहेत. आज मुख्यमंत्री कुठेय असं विचारलं, तर ते तेलंगणाला गेले आहेत. तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत भाषण करणार आहेत?”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT