उद्धव ठाकरे (Uddhav Thacke मुख्यमंत्री असताना वटहुकुम निघू शकत होता, मात्र ठाकरेंनी तो काढलाच नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केला होता. या आरोपावर आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसाना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांच ज्ञान, इतकं तोकडं असेल असं मला वाटलं नव्हतं. वटहुकुम काढण्याचा अधिकार संसदेला असतो, असे ठाकरे म्हणाले आहेत. (udhhav thackeray criticize devendra fadnavis on maratha morcha jalana antaravali sarati)
ADVERTISEMENT
भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपावर उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसांच ज्ञान, इतकं तोकडं असेल असे मला वाटले नव्हते. देवेंद्रला मी थोडं तरी समजत होतो, आता तर ते मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरकण्याच्या पण कुवतीचे नाहीत. जर वटहुकूम सुप्रीम कोर्टाविरूद्ध राज्यसरकार काढायला लागली. तर त्यांनी घटनेचा अभ्यास केलेलाच नाही, असा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांच्या आरोपाचा समाचार घेतला आहे. तसेच वटहुकुम काढण्याचा अधिकार संसदेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिल्लीतला निर्णय़ दिल्ली सरकारने फिरवला का नाही. तो केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राला असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.
जर फडणवीसांना हे वाटतं असेल की मी वटहुकूम का काढला नाही, तर ठिक आहे माझी चुक झाली असेल आता तुम्ही अधिवेशन घ्या, आणि तुम्ही वटहुकुम काढा असे प्रति आव्हानचं ठाकरेंनी फडणवीसांना दिले.
देवेंद्र फडणवीसांचा आरोप काय?
उद्धव ठाकरे 5 मे 2021 पासून एक वर्ष एक महिना मुख्यमंत्री होते, त्यावेळेसे वटहुकुम निघू शकत होता. त्यावेळस तुम्ही वटहुकुम का काढला नाही,असा सवाल फडवणीसांनी ठाकरेंना केला. तसेच जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टीकवलं, सुप्रीम कोर्टात टीकवलं, ते आरक्षण घालवण्याचे काम सध्या मराठा समाजाचा पोळका आल्याचे दाखवत असलेल्या नेत्यांनी घालवल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचे नाव न घेता केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायमुर्ती भोसले, चीफ जस्टीस ऑफ उत्तप्रदेश हायकोर्ट,अलाहबाद हायकोर्ट होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून कसा मार्ग काढायचा या संदर्भात शिफारसी करायला सांगितल्या होत्या. त्या समितीने शिफारसी केल्या होत्या,पण त्यातल्या शिफारशींची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
ADVERTISEMENT