Uddhav thackeray criticized amit shah : ''देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले होते. पण यांची मणिपूरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालून बसलेत. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडेही शेपूट घालून बसले, अरूणाचलमध्ये चीन घुसतेय तिकडे शेपूट घालून बसलेत आणि असा शेपूटघाल्या गृहमंत्री महाराष्ट्रातून आमच्यावर फणा काढून गेलाय'', अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे लातूरमधून बोलत होते. यावेळी ठाकरेंनी अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र डागलं. आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल, पण शिवसेना भाजपला गाडून, संपवून, मुठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही, असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा : Sunil Shelke : 'मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेन पवारांनी केले खोटे आरोप'
अमित शाह आले होते...देशाची गृहमंत्री, मणिपूर पेटलेय तिकडे जायची हिंमत नाही,तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढताय, हा नागोबा आहे... काश्मीरमध्ये जायची हिम्मत नाही, तिकडेही शेपूट, अरूणाचलमध्ये चीन घुसतेय तिकडे शेपूट आणि असा शेपूटघाल्या गृहमंत्री महाराष्ट्रातून आमच्यावर फणा काढून गेला,असा हल्ला ठाकरेंनी अमित शाहांवर केला आहे.
माझ्यावर काय बोलले याचं उत्तर मी देईनच, पण यांची हिम्मत होत नाही तिकडे जायची, अशी टीका ठाकरेंनी शाहांवर केली. आता अमित शहांनी नवीन शोध लावला महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. आमची तर रिक्षा पक्चर झाली आहे, पण तुमच्या ट्रिपल इंजिनचं जे चाललंय, त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहे, 'सगळ्या भ्रष्टाचारांच्या तितुका मेळावा भरवावा, भाजप धर्म वाढवावा, असे अमित शाह आणि मोदींचे चाललंय', असा टोला ठाकरेंनी शाहांना लगावला आहे. .
हे ही वाचा : 'BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला
मोदींच्या फोटो लावून निवडणुका जिंकल्याच्या आरोपावर बोलताना ठाकरे म्हणाले, 'ज्यावेळेला मोदी नाव कुणाला माहिती नव्हतं त्यावेळेला आम्ही धाराशीव जिंकत होतो'.मोदी होते म्हणून तुम्ही...मग मी म्हटलं शिवसेना प्रमुख होते म्हणून तुम्हाला मोदी दिसतायत. आम्हाला काय सांगात मोदींचं कौतुक? पण अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदी दिसलेच नसते, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
ADVERTISEMENT