Vidhan Parishad Election : 'विश्वासघातकी लोकांना असा धडा शिकवणार की...', नाना पटोले प्रंचड संतापले!

मुंबई तक

• 09:48 PM • 12 Jul 2024

Vidhan Parishad Election News : आता कुठलीही कमिटी नेमणार नाही तर थेट कारवाई होणार आहे. आणि हायकमांडचा आदेश आला तर नावं देखील कळतील, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

vidhan parishad election nana patole reaction on congress mla cross voting maha vikas aghadi mahayuti

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले आहेत.

follow google news

Vidhan Parishad Election, Nana Patole : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले आहेत. तर शरद पवारांचे अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटींग केली होती. या क्रॉस व्होटींगवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले आहेत. 'अशा विश्वासघातकी लोकांना आता मी असा धडा शिकवणार की पुढच्या काळात कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले( Nana Patole)यांनी दिली आहे. (vidhan parishad election nana patole reaction on congress mla cross voting maha vikas aghadi mahayuti)  

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'हंडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस मतं फुटली होती. त्यावेळेस बदमाश लोकं आयडेंटीफाय झाली नव्हती. पण यावेळेस ट्रॅप आम्ही लावला होता आणि त्यात हे आमदार सापडले आहेत. हायकमांडला ही बाब कळवली आहे. त्यामुळे लवकरच पक्ष विरोधी काम करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्यांना अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी

या निवडणुकीत आम्ही ट्रॅप लावला होता. हे आमदार या ट्रॅपमध्ये फसले आहेत. त्यामुळे मतं न देणाऱ्या या आमदारांवर कारवाई होणार आहे. यासाठी आता कुठलीही कमिटी नेमणार नाही तर थेट कारवाई होणार आहे. आणि हायकमांडचा आदेश आला तर नावं  देखील कळतील, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. 

पक्षात काही विश्वासघातकी लोकं असतात त्या विश्वासघाती लोकांना आता मी असा धडा शिकवणार की पुढच्या काळात कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही. असी अॅक्शन आम्ही घेणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election: दोन वर्षांपूर्वी 'याच' निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, आज पुन्हा...

महायुती टेक्निकल आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पण महायुतीने राज्याला कर्जात बुडवलं, शेतकऱ्यांच्य़ा जीवनात अंधार केला. महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम केलं, तरूणांना बेरोजगार केलं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. तसेच विधानसभेत महाविकास आघाडीला 225 च्यावर जागा मिळतील, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

    follow whatsapp