Uddhav Tahckeray : आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर आज ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेचे आयोजन करून ठाकरे गटाने शिंदे गटासह विधानसभा अध्यक्षांवरही जोरदार तोफ डागली. यावर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी बोलताना विधानसभा अध्यक्षांना लवाद म्हणत त्यांनी त्यांच्यावर अनेक मुद्यांवरून टीका केली. यावेळी राऊतांनी सांगितले की, नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा त्यांच्या बायकोलाही मान्य नसेल. त्याच बरोबर ज्यांनी निकाला दिला आणि नंतर ज्यांनी जल्लोष केला असला तरी आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही मात्र बेईमानीनं जिकंलात असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर तोफ डागली. यावेळी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना म्हणाले की, त्यांनी दिलेला हा निर्णय त्यांच्या बायकोलाही मान्य नसेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
ADVERTISEMENT
शिवसेना चोरांच्या हातात
ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेमधून संजय राऊतांनी टीका करताना कायद्याच्या भाषेत शिंदे गटावर टीका केली. विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिला असला तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र त्यांनी चोरांच्या हातात दिली असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी त्यांच्यावर केला आहे. संजय राऊतांनी या निर्णयावर बोलताना त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी हा निर्णय दिला असल्यामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांविरोधात राज्याभरात प्रेतयात्रा निघाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Sharad Pawar : “आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी…”, पवार स्पष्टच बोलले
महाराष्ट्रात खदखद
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवाद म्हणा असं आदित्य ठाकरे सांगतात असा टोला त्यांना लगावत संजय राऊत यांनी त्यांच्यावर तोफ डागली. भारताच्या आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखाद्या निर्णयामुळे विधानसभा अध्यक्षांच्या नावाने प्रेतयात्रा निघाल्या असतील. त्यामुळे ही खदखद राज्याभर व्यक्त होत राहिली असंही त्यांनी मत व्यक्त केले.
निकाल बायकोलाही मान्य नसेल
खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि विधानसभा अध्यक्षांवर टीका करताना त्यांच्या निकाल चुकीचा दिला असल्याचेही सांगितले. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी हा निकाल दिला असला तरी हा निकाल त्यांच्या बायकोलाही मान्य नसेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
आम्ही इमानदारीने लढलो
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय दिला. या निकालाच्या काळात आमच्याकडे कायमच हिम्मत राहिली आहे. त्याचबरोबर आमच्याकडे काहीच चुकलं नाही, त्यामुळेच लोकांनी निवडून दिलेल्या आणि लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लवादासमोर आण्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही मात्र बेईमानीनं जिंकला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT