Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?

मुंबई तक

25 Jul 2024 (अपडेटेड: 25 Jul 2024, 05:37 PM)

Shyam Manav News : अनिल देशमुख यांनी या आरोपांना दुजोरा देत देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे या आरोपानंतर आता राजकारण चांगलेच पेटले आहे. त्यामुळे खळबळजनक आरोप करत राजकीय वर्तुळात भूकंप आणणारे श्याम मानव कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

who is shyam manav claim uddhav thackeray ajit pawar jail conspiracy anil deshmukh devendra fadnavis maharashtra politics

राजकीय वर्तुळात भूकंप आणणारे श्याम मानव कोण आहेत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्याम मानव कोण आहेत?

point

राज्यातील चार बड्या नेत्यांना तुरूंगात डांबण्याचा डाव होता

point

अनिल देशमुख यांनी आरोपांना दुजोरा दिला

Who is Shyam Manav : राज्यातील चार बड्या नेत्यांना तुरूंगात डांबण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी काहीदिवसांपूर्वीच केला होता. या दाव्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या आरोपांना दुजोरा देत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे या आरोपानंतर आता राजकारण चांगलेच पेटले आहे. त्यामुळे खळबळजनक आरोप करत राजकीय वर्तुळात भूकंप आणणारे श्याम मानव कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (who is shyam manav claim uddhav thackeray ajit pawar jail conspiracy anil deshmukh devendra fadnavis maharashtra politics)  

हे वाचलं का?

कोण आहेत श्याम मानव? 

श्याम मानव यांचा जन्म 9 सप्टेंबर 1951 रोजी वर्धा जिल्ह्यात देवळी येथे झाला. 

श्याम मानव यांचे वडील ज्ञानदेव हे विनोबा भावे यांचे काहीकाळ स्वीय सहाय्यक होते. ते गांधीवादी होते आणि प्रदीर्घ काळ त्यांना विनोबांबरोबर काम करता आले. श्याम मानव यांच्या आई कमल या शिक्षिका होत्या. 

श्याम मानव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ, हिप्नोथेरपी तज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.

श्याम मानव हे स्वसंमोहन चिकित्सा क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जातात. स्मरणशक्ती वाढविण्याचे तंत्र, कौटुंबिक संबंध आणि पालकत्व यांवर तो सतत कार्यशाळा घेत असतात.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?

श्याम मानव यांनी वर्धा येथून बीएम आणि नागपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आहे. 

कॉलेजमध्ये ते तरुण शांती सेनेचे सदस्य झाले आणि जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनी या संघटनेत सक्रिय सहभाग घेतला. 

1975-76 दरम्यान आणीबाणीच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांना 9 महिने तुरुंगातही पाठवण्यात आले होते. 

पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आणि अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केले.

श्याम मानव हे पुराणमतवादी कुटुंबातून आलेले असल्याने त्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता. त्याने अनवाणी चालणे देखील टाळले कारण ती माती कोणीतरी वापरू शकते असा त्याचा विश्वास होता.

 महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अनेक प्रकारच्या विचार समारंभात ते सहभागी होऊ लागले. त्यामुळे त्यांची विचारसरणी बदलली आणि तो अंधश्रद्धेला विरोध करू लागला.

1982 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाया रचण्यात त्यांचा वाटा आहे.

देव आणि धर्माला आपला विरोध नसून देव-धर्माच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडण्याला आपला विरोध आहे असं ते सांगतात. 

श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी विशेष श्रम घेतले होते. 

हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत आणण्याचे प्रयत्न 2005 पासून सुरू झाले. महाराष्ट्रात 2014 मध्ये कायदा म्हणून त्याची अंमलबजावणी झाली.

हे ही वाचा : Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं, शिंदे, अजित पवारांना काय म्हणाले?

धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला होता. बाबांना सिद्धी नाही ते लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांनी बाबा ढोंगी असल्याचा आरोप करत त्यांना नागपुरात मंचावर येऊन चमत्कार दाखवल्यास 30 लाख रुपये दिले जातील, असे आव्हान दिले होते. 

श्याम मानव यांचा नेमका दावा काय?
अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या घरी एकूण 4 प्रतिज्ञापत्र पाठविण्यात आली होती. त्यावर सह्या करा आणि ईडी कारवाईपासून वाचा, असा निरोप अनिल देशमुख यांना देण्यात आला होता.  त्यावेळी सत्तेत नसलेल्या भाजपच्या नेत्यांनी ही ऑफर दिली होती. 

पहिल्या प्रतिज्ञापत्रात असं नमूद करण्यात आलं होतं की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर बोलावून 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते. तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला होता.

तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परबांचे गैरव्यवहार आणि बांधकामं याबाबत काही गोष्टी होत्या. तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांनी गुटखा विक्रेत्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते. असं म्हणत श्याम मानव यांनी भाजपवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.  
 

    follow whatsapp