Mahendra dalvi Jayant Patil Maharashtra MLC election : विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे जयंत पाटील पराभूत झाले. त्यांच्या या पराभवाचा आनंद अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी चिखलात लोळत व्यक्त केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Shiv Sena MLA Mahendra Dalvi did Celebration by sleeping in the mud after Jayant Patil's defeat in the Legislative Council elections 2024)
ADVERTISEMENT
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, महाविकास आघाडीची मते फुटली आणि जयंत पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आमदार महेंद्र दळवी चिखलामध्ये का नाचले?
महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत. अलिबाग हा शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षात शेतकरी कामगार पक्षाची पकड सैल होत गेली.
हेही वाचा >> "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले
२०१९ मध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विजयी झाले. त्यानंतर दळवी यांनी शेकाप खिळखिळी करण्याचे काम सुरू केले. शेकापचे अनेक पदाधिकारी, स्थानिक नेत्यांना त्यांनी शिवसेनेत आणले.
जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महेंद्र दळवींच्या आनंदाला उधाण आले. जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा निर्धार आमदार दळवींनी व्यक्त केला होता. त्यानंतर पाटलांचा पराभव झाला.
ADVERTISEMENT