आशिया कप २०२२ च्या सुपर ४ सामन्यात भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने अफगाणिस्तानच्या विरोधात दमदार खेळी केली. १२२ धावा विराटने या मॅचमध्ये केल्या. सुमारे तीन वर्षांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवलं. विराटने आपली खेळी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला डेडिकेट केली आहे. तसंच आपण कठीण काळातून जात होतो त्यावेळी अनुष्का कायमच पाठिशी उभी राहिली असंही विराटने म्हटलं आहे. यानंतर आता विराटसाठी अनुष्काने पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय आहे विराटसाठी अनुष्काने लिहिलेली पोस्ट?
अनुष्का शर्माने विराट कोहलीचे टीम इंडियाच्या जर्सीमधले फोटो शेअर केले आहेत. तसंच तिने हे लिहिलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीत कायम तुझ्यासोबत असेन. अनुष्काने लिहिलेली ही एकच ओळ आहे मात्र त्या ओळीची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होते आहे. अनुष्काच्या या पोस्टवर वरूण धवन, श्रद्धा कपूर, अथिया शेट्टी, सोनाली बेंद्रे या सगळ्यांनी लाईक्स किंवा कमेंट्स केल्या आहेत. त्याचप्रमाणे विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनीही हार्ट इमोजीज दिले आहेत आणि कमेंटही केल्या आहेत.
‘तुझ्या डोळ्यात अश्रू होते…. ‘ विराट कोहलीसाठी अनुष्का शर्माने लिहिली भावनिक पोस्ट
विराटने शतक अनुष्का आणि वामिकाला केलं समर्पित
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्ताविरोधातल्या सामन्यात टी २० क्रिकेटमध्ये धडाकेबाज शतकी खेळी केली. आपली ही सेंच्युरी विराटने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांना डेडिकेट केली आहे. या दोघींनीच मला कठीण काळात साथ दिली असं विराट कोहलीने म्हटलं आहे. माझ्या कठीण काळात एकच व्यक्ती माझ्या पाठिशी उभी राहिली ती म्हणजे अनुष्का असं विराटने म्हटलं आहे आणि तिला आपली सेंच्युरी डेडिकेट केली आहे.
अनुष्का आणि विराट या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. अनेकदा अनुष्का शर्मा मॅच पाहण्यासाठी जात असे. तेव्हा जर विराटचा खेळ बिघडला तर अनुष्काला ट्रोलही करण्यात आलं आहे. मात्र अनुष्काने या सगळ्याकडे फारसं लक्ष न देता आपलं विराटवरचं प्रेम वेळोवेळी दाखवून दिलं. अनुष्का शर्मा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे आणि विराटचे तसंच मुलगी वामिकाचे फोटो शेअर करत असते.
अनुष्का शर्माचा पुढचा सिनेमा चकदा एक्स्प्रेस हा आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा भारताची स्टार महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे. अनुष्का शर्मा तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटपटूची भूमिका साकारते आहे. याआधी सलमान खान सोबत केलेल्या सुलतान या सिनेमात तिने महिला रेसलरची भूमिका साकारली होती. तर २०१८ मध्ये ती शाहरुखच्या झिरो या सिनेमातही झळकली होती.
ADVERTISEMENT