IPL ला मिळाले दोन नवीन भिडू, अहमदाबाद आणि लखनऊ संघ पुढील वर्षापासून मैदानात

मुंबई तक

• 02:07 PM • 25 Oct 2021

आयपीएलचा पुढचा हंगाम हा १० संघांनिशी असणार हे आता निश्चीत झालं आहे. दुबईत आज पार पडलेल्या दोन नवीन संघांच्या लिलावात CVC Capital Partners ग्रूप आणि उद्योगपती संजीव गोएंका यांच्या RPSG ग्रूप यांनी बाजी मारली आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघांचा आयपीएलमध्ये प्रवेश झाला असून पुढील हंगामापासून हे दोन्ही संघ मैदानावर उतरताना दिसतील. महत्वाची गोष्ट […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलचा पुढचा हंगाम हा १० संघांनिशी असणार हे आता निश्चीत झालं आहे. दुबईत आज पार पडलेल्या दोन नवीन संघांच्या लिलावात CVC Capital Partners ग्रूप आणि उद्योगपती संजीव गोएंका यांच्या RPSG ग्रूप यांनी बाजी मारली आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघांचा आयपीएलमध्ये प्रवेश झाला असून पुढील हंगामापासून हे दोन्ही संघ मैदानावर उतरताना दिसतील.

हे वाचलं का?

महत्वाची गोष्ट म्हणजे अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी शर्यतीत असलेल्या अदानी ग्रूपने ५ हजार कोटींची बोली लावल्याचं समजतंय. त्यामुळे अवघ्या काही शे कोटींच्या फरकाने अदानी ग्रूप या शक्यतीतून बाहेर पडला आहे. संजीव गोएंका यांच्या ग्रूपने लखनऊ संघासाठी ७ हजार ९० कोटी तर CVC ग्रूपने अहमदाबाद संघासाठी ५ हजार ६२५ कोटी रुपये मोजले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना पार पडल्यानंतर आज दुबईत आयपीएलच्या दोन संघांचा लिलाव होणार होता. या दोन नवीन संघांसाठी उद्योगपती गौतम अदानी, संजीव गोएंका, इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड चे मालक, जिंदाल स्टिल, टोरेंट फार्मा, ऑरोबिंदो फार्मा आणि CVC Capital Partners या कंपन्या शर्यतीत होत्या. सुरुवातीपासून अदानी ग्रूप आणि संजीव गोएंका यांचा RPSG ग्रूप शर्यतीत होता.

परंतू ऐनवेळी अदानी उद्योगसमूह या शर्यतीतून बाहेर पडल्याचं कळतंय. अदानी उद्योग समुह हा संघाचा लिलाव होण्याच्या प्रक्रियेच्या आधीपासून अहमदाबाद संघ विकत घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर होता. परंतू अखेरच्या क्षणांमध्ये CVC ग्रूपने बाजी मारली आहे.

संजीव गोएंका यांच्या RPSG ग्रूपची आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा एंट्री आहे. मध्यंतरी चेन्नई आणि राजस्थानच्या संघावर दोन वर्षांसाठी कारवाई झालेली असताना पुणे आणि अहमदाबाद संघांना प्रवेश देण्यात आला होता, त्यावेळी संजीव गोएंका यांच्या समुहाने पुण्याच्या संघाची मालकी विकत घेतली होती. दुसरीकडे CVC Capital Partners हा उद्योगसमूह युरोप, आशिया आणि अमेरिका या तिन्ही भागांमध्ये पसरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच CVC उद्योगसमुहाने प्रसिद्ध फुटबॉल लिग La Liga मध्ये समभाग खरेदी केले होते. याव्यतिरीक्त फॉर्म्युला वन आणि रग्बी लिगमध्ये CVC ग्रूपची मोठी गुंतवणूक आहे.

    follow whatsapp